कार्यकर्त्यांनो; आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:22 PM2018-03-24T22:22:14+5:302018-03-24T22:22:14+5:30

भाजपाच्या कारभाराला सामान्य जनता कंटाळलेली आहे. फक्त श्रीमंतांच्या हितातेच काम करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी छातीला माती लावून पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

Workers; Be ready for the upcoming election | कार्यकर्त्यांनो; आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा

कार्यकर्त्यांनो; आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : काँग्रेस बुथ समन्वयकांची बैठक

आॅनलाईन लोकमत
नवेगावबांध : भाजपाच्या कारभाराला सामान्य जनता कंटाळलेली आहे. फक्त श्रीमंतांच्या हितातेच काम करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी छातीला माती लावून पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुथ समन्वयकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व नागपूर विभाग समन्वयक जिया पटेल, अर्जुनी-मोरगाव विधानसभा समन्वयक रत्नदीप दहिवले, माजी आमदार रामनतरबापू राऊत, माजी जि.प. अध्यक्ष के.आर. शेंडे, नामदेव किरसान, अमर वराडे, विशाल शेंडे, तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष शेषराव गिरेपुंजे, उषा शहारे, जि.प. सदस्य सरिता कापगते, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, आनंदकुमार जांभुळकर, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, डॉ. बबन कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांनी छातीला माती लावून काम करायचे आहे. भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी समस्यांना बाजूला केले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बुथ संघटन मजबूत करावे. जेणे करुन सर्वांनाच नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
महाराष्ट्र प्रदेश काँग़्रेस कमिटीचे निष्ठावान कार्यकर्ते तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवर बुथ समन्वयकांची संकल्पना पुढे आणलेली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी बुथ समन्वयकांची जबाबदारी फार महत्वाची आहे. लोकसभेची पोट निवडणूक व विधानसभेची आगामी निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकतात. यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी सज्ज रहावे असेही ते म्हणाले.
विधानसभा समन्वयक दहिवले यांनी, विधानसभा क्षेत्रात सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळे जनता त्रासलेली आहे. त्यामुळे काँग़्रेसचे संघटन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. विभाग समन्वयक पटेल यांनी, बुथ समन्वयकांची भूमिका सविस्तरपणे सांगत बुथ समन्वयक हा काँग्रेसचा महत्वाचा कार्यकर्ता आहे असे सांगीतले.
कार्यक्रमात पटोले व पटेल यांच्या हस्ते प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे विधानसभा समन्वयकाचे नियुक्तीपत्र दहिवले यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक मांडून संचालन तालुकाध्यक्ष नाकाडे यांनी केले. आभार कमल जायस्वाल यांनी मानले.
कार्यक्रमासाठी परेश उजवने, राजू पालीवाल, जगदीश पवार, संतोष नरुले, बबलू सिपानी, वसिम शेख, गोविंदभाई पटेल, नितीन भालेराव आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Workers; Be ready for the upcoming election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.