६०० कि.मी.चा प्रवास करुन मजुरांनी गाठले नवेगावबांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:22+5:30
लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.
रामदास बोरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि बालाघाट कटंगी येथून काही मजूर रोजगारासाठी हैद्राबाद येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने त्यांना आपल्या गावाकडे परत जाण्याची वेळ आली. तब्बल सहा दिवस ६२४ कि.मी.चा प्रवास करुन ३१ मार्चला रात्री १२ वाजता हे मजूर देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकºयांनी या सर्वांची जेवनाची सोय रात्रीच केली.त्यामुळे अन्नपाण्याविना प्रवास करणाºया मजुरांना नवेगावबांध देवलगाव येथे माणुसकीचे दर्शन घडले.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर काही व्यक्ती असल्याची माहिती गावकºयांना मिळाली. गोंदिया जिल्हा शिवसेना उपप्रमुख शैलेश जयस्वाल, अनिल जैन, प्रकाश तरोणे, पोलीस नायक बापू येरणे, साबीर शेख, तलाठी पुंडलिक कुंभरे हे रेल्वेस्थानकावर पोहोचले. या मजुरांना विचारणा केली असता मजुरांनी हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलो होतो असे सांगितले.
लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.
तब्बल सहा दिवस ६२५ कि.मीे.चा प्रवास केल्यानंतर ते मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वे स्थानकावर पोहचले. चार दिवस त्यांच्याकडे थोडेसे खाण्यापिण्याचे साहित्य होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास केवळ पाण्यावरच सुरू होता असे मजुरांनी गावकºयांना सांगितले. काही झाले कितीही त्रास झाला तरी आपण आपले गाव गाठायचे असा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचे सांगत आपली व्यथा गावकºयांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकून गावकºयांचे सुध्दा डोळे पाणावले. माधव चचाणे यांनी पुढाकार घेऊन या सर्व मजुरांची जेवनाची सोय रात्रीच केली. त्यानंतर या सर्व मजुरांनी येथील रेल्वे स्थानकावर विश्रांती केली.दिवस उजाडताच या मजुरांनी आपल्या गावाकडच्या प्रवासाला सुरूवात केली.
रात्रीचे बारा वाजले असताना सुध्दा गावकºयांनी या मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केल्याने नवेगावबांधकरांच्या प्रेमाने हे मजूर सुध्दा भारावून गेले होते.त्यांनी गावकºयांचे आभार मानत ६२५ कि.मि.च्या प्रवासात ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगितले.