कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:01+5:302021-07-13T04:07:01+5:30
गोंदिया : खोटे बोलून ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यांनीच डिझेल महाग केल्याने शेतकऱ्यांच्या ...
गोंदिया : खोटे बोलून ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यांनीच डिझेल महाग केल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च दुपटीने वाढलेला आहे. पेट्रोल, खाद्यतेल महाग झाल्याने सामान्य जनतेला महागाईचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देणे, रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देणे व शेतमजूर वर्गाच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे. या सर्व गोष्टींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस भवन येथे आयोजित तालुक्यातील पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काटी जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, गणेश बरडे, जितेश टेंभरे, मोहन पटले, गोविंद तुरकर, चंदन गजभिये, सुनील पटले, शैलेश वासनिक, रजनी गौतम, उषा मेश्राम, धनंजय गुप्ता, वर्षा पंधरे, सतीश कोल्हे, डाॅ. रुपलाला चिखलोंढे, तेजलाल येडे, नानू मूदलीयार, राजेश नागपुरे, खोमेंद्र कटरे, गुलाब नागदिवे, अश्विन ढोमणे उपस्थित होते. खासदार पटेल यांनी केलेल्या विकास कामाचा प्रसार-प्रचार करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे सांगितले. प्रत्येक बूथवर किती लोकसंख्या आहे याचा विचार करून प्रत्येक माणसाला जोडण्याचे काम करावे असे सांगितले. याप्रसंगी मलीन कुरेशी, लोकेश जगने, नजीम शेख, राज बोपचे, अभय गोले, इमरान शेख व अन्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.