कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा

By admin | Published: May 13, 2017 01:43 AM2017-05-13T01:43:34+5:302017-05-13T01:43:34+5:30

सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत

Workers should take advantage of ritual service | कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा

कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा

Next

इशरत शेख : कायदेविषयक साक्षरता जनजागृती कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत विधी सहाय दिले जाते. कामगारांनी सुध्दा विधी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव इशरत शेख यांनी केले.
तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट मध्ये आयोजित कायदेविषयक सारक्षता जनजागृती कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा येथील न्या.आर.एस.पाजनकर, न्या.ए.बी.तहसीलदार, न्या. आर.डी.भुयारकर, न्या.पी.सी.बच्छेले, न्या.व्ही.पी.खंडारे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.टी.बी.कटरे, अ‍ॅड.जे.एल.परमार, अ‍ॅड.बोंबार्डे, अ‍ॅ्रड.वाय.एस.हरिणखेडे, संजय अरगडे, एच.आर.प्रमुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शेख यांनी, कार्यक्र मात उपस्थित प्रत्येकाने तसेच ज्यांना कामगारांच्या हिताच्या कायदयाबाबतचे ज्ञान आहे त्यांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांना विधी सेवेबाबतची माहिती दयावी, जेणेकरु न कामगारांना त्यांच्या हिताचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेता येईल असे सांगीतले.
न्या.तहसीलदार यांनी, कामगारांच्या हिताच्या विविध कायद्यांवर आधारित माहिती दिली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.कटरे यांनी, कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रि येबाबत माहिती दिली. अ‍ॅड.परमार यांनी, कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले. अ‍ॅड.बोंबार्डे यांनी, कामगार व कंपनी मालक यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे, जेणेकरु न दोघांचेही हित साध्य होईल असे सांगितले.
अदानी पॉवर प्लांटचे मुख्य व्यवस्थापक एस.के.मित्रा यांनी अदानी प्लांटमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार तसेच वेळोवेळी येणाऱ्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक योजनांचा लाभ दिला जातो. तसेच नुकसान भरपाई, मोफत वैद्यकीय तपासणी व इतर लाभ दिले जातात असे सांगितले. यावेळी अ‍ॅड.बढे यांनीही मार्गदर्शन केले.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर.एस.पाजणकर यांनी, कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, तर भारतीय संविधानाचे वचन पूर्ण होईल. कामगारांवर अन्याय होत असेल तर त्यांनी नक्कीच न्यायालयात दाद मागायला पाहिजे. कामगारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करु न देणे हे विधी सेवा संस्थांची जबाबदारी आहे असे प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्र माला अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन अ‍ॅड. एम.आर.रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या.व्ही.पी.खंडारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तिरोडा येथील दिवाणी न्यायालयात व अदानी प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Workers should take advantage of ritual service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.