कार्यालयात काम करत असताना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:43+5:302021-08-28T04:32:43+5:30

गोंदिया : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करत असताना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे. आपण आपल्या कार्यालयात ‘टिम वर्क’ म्हणून काम ...

Working as a ‘Team Work’ while working in the office () | कार्यालयात काम करत असताना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे ()

कार्यालयात काम करत असताना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे ()

Next

गोंदिया : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करत असताना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे. आपण आपल्या कार्यालयात ‘टिम वर्क’ म्हणून काम केले तर कितीही कठीण काम असले तरी त्या कामाचे सहज निराकरण करणे सोयीचे होत असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले.

नायब तहसीलदार जी. पी. सिंगाडे, मंडळ अधिकारी डी. एच. पोरचेट्टीवार, मंडल अधिकारी बी. डी. भेंडारकर व अव्वल कारकून आशिष रामटेके यांची बदली झाल्यामुळे गुरुवारी (दि.२६) उपविभागीय कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार आर. एन. पालांदूरकर, नायब तहसीलदार सीमा पाटणे, उपविभागातील सर्व मंडल अधिकारी, अव्वल कारकून, सर्व तलाठी, महसूल सहायक, कोतवाल, शिपाई, ऑपरेटर उपस्थित होते. संचालन महसूल सहायक अनुप मेश्राम यांनी केले. आभार पुरवठा निरीक्षक वैभव तोंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तलाठी डी. आर. भोयर, रियाज तुरकर, हटवार, शिवणकर, दिवाकर गोले, जी. पी. सोनवाने, अव्वल कारकून सारिका बनसोड, ए. पी. घडोले, मुकुल तिवारी व कोतवाल बी. आर. पारधी यांनी सहकार्य केले.

Web Title: Working as a ‘Team Work’ while working in the office ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.