आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 01:54 AM2016-07-07T01:54:14+5:302016-07-07T01:54:14+5:30

शासन निर्णय ८ जून २०१६ च्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाच्या विरोधात अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया, भंडारा व नागपूरच्या ....

Workshop of the Ashram Shala employees | आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा

आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Next

देवरी : शासन निर्णय ८ जून २०१६ च्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाच्या विरोधात अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया, भंडारा व नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने नागपूरच्या आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयावर नुकतेच धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
मोर्च्याचे नेतृत्व आ.ना.गो. गाणार, माजी आ. डायगव्हाणे, विदर्भ शिक्षक संस्कृती संघाचे प्रवर्तक व आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे सचिव विलास सपाटे, आश्रमशाळा कर्मचारी संघाचे अध्यक्ष भोजराज फुंडे आणि कोचे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात सदर मोर्चा काढून सांगता संविधान चौकात करण्यात आली. धरणे आंदोलन दरम्यान पाटील वक्त्यांची भाषणे झालीत. या वेळी काम नाही वेतन नाही या शासनाच्या जी.आर.नुसार आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर व आर्थिक शोषणावर आपले विचार स्पष्ट केले.
याप्रसंगी मोर्च्याच्या शिष्टमंडळाने अप्पर आयुक्त नागपूरचे प्रतिनिधी सहायक प्रकल्प अधिकारी रानडे यांच्यामार्फत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांच्या नावे निवेदन सादर केले.
या निवेदनात काम नाही वेतन नाही हा काळा जीआर त्वरीत रद्द करा, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईल तोवर नियमित वेतन अदा करा, या कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाच्या इतर विभागात करण्यात यावे, अतिुरक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कारवाई ६ जून २०११ च्या परिपत्रकानुसार करून संस्थेवर कारवाई करण्यात यावे, नव्याने नामांकित शाळा देणे बंद करा, यासह इतर मागण्यांचा समावेश होता.
मोर्च्यात संपूर्ण विदर्भातून जवळपास दीड हजार शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. संचालन जे.पी.खुणे यांनी केले. उपस्थितांचे आभार बी.एस.मडावी यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Workshop of the Ashram Shala employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.