एमआयईटीत रोबोटवर कार्यशाळा

By Admin | Published: February 29, 2016 01:28 AM2016-02-29T01:28:05+5:302016-02-29T01:28:05+5:30

इंजिनिअरींग व टेक्नालॉजीत सातत्याने होत असलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे ...

Workshop on Robots at MIET | एमआयईटीत रोबोटवर कार्यशाळा

एमआयईटीत रोबोटवर कार्यशाळा

googlenewsNext

१३० विद्यार्थ्यांचा सहभाग : ४० जणांची स्पर्धेसाठी निवड
गोंदिया : इंजिनिअरींग व टेक्नालॉजीत सातत्याने होत असलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे आर्डीनो व रोबोटिक्स विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा आ.राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.एस.एस. राठोड यांनी आयोजित केली होती. या कार्यशाळेत १३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन विभाग प्रमुख प्रा.देवेंद्रकुमार पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अतिथी म्हणून ए.के.सिंग, प्रांजल कुमार, संयोजक संजय असाटी उपस्थित होते. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. पांडे यांनी रोबोटची उपयोगिता यावर मार्गदर्शन केले. औद्योगिक व घरगुती कामासाठी रोबोटची कार्यपध्दती व सहकार्य यावर माहिती दिली. प्रास्ताविक संजय असाटी यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थी टिकावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नोडल राऊंड ने दहा चमूत ४० विद्यार्थ्यांची निवड केली. सदर निवड झालेले विद्यार्थी ३ ते ५ मार्च दरम्यान आयआयटी खडगपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
यावेळी लिग व नॉनआऊट आधारावर घेण्यात आलेल्या रोबमेक सोहळा या स्पर्धेत ३२ चमूनी भाग घेतला. यात युवराज कावळे, जय चव्हाण, विकास डोंगरवार व जयेश पटले यांची चमू विजयी तर नेहा उपवंशी, स्वप्नील जैन, शितल चौधरी, विशाखा पटले यांच्या चमूला उपविजेती चमू म्हणून घोषीत करण्यात आले.
विजेता व उपविजेता चमूला आंतरराष्ट्रीय मानक संस्थान, ह्युस्टन (अमेरिका) येथील प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी डॉ.विजय चौरसिया, प्रा. हितेश जोशी, एम.आर.वैद्य, शुभम बैस, संकेत भुजाडे, परेश चव्हाण, सचिन बिसेन, धर्मांशु अग्रवाल, सागर दोनोडे, राहुलसिंग, रोहीत बादुले, मोनालिसा व दिशा यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workshop on Robots at MIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.