जागतिक रक्तदान दिवस साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:54+5:302021-06-18T04:20:54+5:30
अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावित दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, यामुळे शरीरास उर्जा मिळून आरोग्य ...
अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावित दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, यामुळे शरीरास उर्जा मिळून आरोग्य चांगले राहत असल्याचे सांगितले. तसेच रक्तदानासाठी स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन केले. गणेश पारीस्कर यांनी जेव्हा ही रक्तपेढीस रक्ताची गरज भासेल तेव्हा कर्मचारी संघटनेमार्फत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येईल व रक्ताची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी ईश्वर डफरे, उमेश कावरे, राजेश सिंदुसरे, गणेश पारिस्कर, शिवम धारड, संदीप सोळंकी, सोमनाथ माटे यांचे पु्ष्पगुच्छ व राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमाणपत्र वितरीत करुन सन्मानित करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. शैलेंद्र यादव, रक्तपेढी प्रमुख डॉ. संजय चव्हाण, जनसंर्पक अधिकारी अनिल गोंडाणे यांनी कर्मचारी संघटनेचे आभार मानले.