आंबेडकरांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:54 PM2019-01-25T22:54:24+5:302019-01-25T22:55:58+5:30
जग हे विज्ञानाच्या मार्गाने गेले पाहिजे. यासाठी सर्व समाजातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची याकरीता गरज असून त्यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी प्रा. युवराज गंगाराम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : जग हे विज्ञानाच्या मार्गाने गेले पाहिजे. यासाठी सर्व समाजातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांची याकरीता गरज असून त्यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी प्रा. युवराज गंगाराम यांनी केले.
लोककला साहीत्य सेवाभावी बहुुउद्देशीय संस्थेच्यावतीने जवळील ग्राम येरंडी येथे आयोजीत परिवर्तनशील साहीत्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि.२५) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आंबेडकरी लेखक विचारवंत व मंत्रालय प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते साहीत्य संमेलनाच्या थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी देवकू खोब्रागडे विचारमंचवर विद्रोही कवी खेमराज भोयर, अनिल बिसेन आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. अविनाश डोळस साहित्यनगरीमध्ये पुढे बोलताना प्रा. गंगाराम यांनी, बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या तत्व, साहित्य व विचारांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सबंध बहुजन समाजाला सर्वच महापुरुषांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर तागडे यांनी, तथागतांचा धम्म आणि आंबेडकरी विचारांनीच परिवर्तन शक्य होईल. धम्म हा विज्ञानवादी व मानवतावादी आहे. म्हणून शिलानेच परिवर्तन हे माणसाच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे मत व्यक्त के ले.
प्रास्ताविक संयोजक मुन्नाभाई नंदागवळी यांनी मांडले. संचालन के.ए.रंगारी यांनी केले. आभार निमंत्रक मयूर खोब्रागडे यांनी मानले. संमेलनासाठी प्रभाकर दहीकर, करिम गेडाम, चंदू तागडे, समीर गेडाम, अजीत गेडाम, सुहास बोरकर, सम्यक बोरकर, मनमीत कांबळे आदिंनी सहकार्य केले.