जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले दिन कार्यक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 AM2021-03-17T04:30:01+5:302021-03-17T04:30:01+5:30
आमगाव : तालुका सखी मंच शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून स्थानिक काली ...
आमगाव : तालुका सखी मंच शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून स्थानिक काली मंदिर आमगाव येथे रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उषा भांडारकर, वर्षा शर्मा, सुनंदा बागडे, हिना रहांगडाले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कवयित्री संमेलनाला सुरुवात झाली. यात संध्या ब्राम्हणकर, दीपा टेंभरे, सारिका परतेकी, प्रीती वैष्णव यांनी भाग घेतला. यादरम्यान वक्तृत्व स्पर्धा व पथनाट्य घेण्यात आले. यात मंगला गायधने, बबिता मेश्राम, उषा मेंढे, मंजूषा पाथोडे यांनी भाग घेतला. त्यानंतर संगीतमय पथनाट्य सादर करण्यात आले. यात नंदिनी दहीकर, आम्रपाली गणवीर, रजनी बनपूरकर,रश्मी मेंढे यांनी भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत साधना बोरकर, दीपा टेंभरे यांनी स्त्रियांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन संयोजिका मंगला शिंगाडे यांनी केले तर आभार सह संयोजिका रुपम शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला रश्मी मेंढे, जयश्री चौधरी, योगिता ब्राम्हणकर, रजनी मेश्राम, संजना असाटी, प्रीती वैष्णव यांनी सहकार्य केले.