चिंताजनक! गोंदिया जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:00 AM2020-10-20T06:00:00+5:302020-10-20T06:00:13+5:30

Gondia News Corona ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एका गोंदिया जिल्ह्यात वाढल्याचे दिसून येत आहे.

Worrying! Gondia district has more victims than survivors of corona | चिंताजनक! गोंदिया जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

चिंताजनक! गोंदिया जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

Next
ठळक मुद्दे६ दिवसांतील आकडेवारीपुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एका वाढल्याचे दिसून येत आहे. बाधित कमी व मात करणारे जास्त अशी स्थिती आता बदलली असून १३ ऑक्टोबरपासून पुन्हा मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या नोदविली जात आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात जिल्हावासीयांनी पुन्हा आता आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे झाले आहे.
सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीने सर्वांनाच दहशतीत आणल्यानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरूवात दिलासा देणार ठरली. बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणाऱ्या कोरोना योद्धांची संख्या जास्त असे चित्र जिल्ह्यात दिसून येत होते. त्यामुळे झपाटयाने बाधितांची संख्या कमी झाली होती. परिणामी जिल्हावासी टेन्शनमधून बाहेर पडू लागले होते. १२ ऑक्टोबर पर्यंतची आकडेवारी जिल्हावासीयांना सुखावणारी दिसून येत होती. ही आकडेवारी बघता जिल्ह्यात कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले असे वाटत होते.

मात्र जिल्हावासीयांचा हा भ्रण जास्त काळ टिकला नाही व १३ ऑक्टोबरपासून पुन्हा चित्र पालटले व मात करणाऱ्यापेक्षा बाधितांची संख्या जास्त नोंदविली जाऊ लागली. ही वाढ सलग सुरूच असून १३ ते १८ ऑक्टोबर या ६ दिवसांत जिल्ह्यात ७१८ बाधित तर ३९७ मात करणारे असे आकडे आहेत.
एकंदर कोरोना जिल्ह्यात पुन्हा पाय पसरू लागला आहे असे चित्र दिसून येत आहे. परिणामी जिल्हावासीयांनी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचा काटेकोरपणे अंमलात आणणे आताही गरजेचे आहे हे दिसून येत आहे.

नवरात्रोत्सवात जास्त काळजीची गरज
नवरात्रोत्सवामुळे सध्या नागरिकांचे घराबाहेर पडणे सुरू झाले असल्याचे दिसत आहे. नवरात्री बघता पाहिजे त्या प्रमाणात गर्दी दिसत नसली तरीही नागरिक देवी दर्शनासाठी म्हणून घराबाहेर पडत आहेत. अशात नागरिकांचा संपर्क वाढणार व हीच कोरोनाला आपला विळखा अधिक घट्ट करण्यासाठी अनुकूल स्थिती असते. यामुळे नागरिकांनी धोका कमी झाल्याच्या संभ्रमात न राहता आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणून आणखी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Worrying! Gondia district has more victims than survivors of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.