दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:32 AM2017-10-11T00:32:51+5:302017-10-11T00:33:02+5:30

इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन दस्तलेखक (अर्जनवीस) व मुद्रांक विके्रते संघटनेने सोमवारपासून (दि.९) कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Writer and Stamp Dealers' Exile Workshop Movement | दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

Next
ठळक मुद्देसंघटनेची मागणी : कमिशनमध्ये वाढ करा, अनुकंपा तत्वाचा लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन दस्तलेखक (अर्जनवीस) व मुद्रांक विके्रते संघटनेने सोमवारपासून (दि.९) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असून मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे, अधिकृत सेवा केंद्र (एएसपी) दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांना देण्यात यावे, मरण पावलेल्या परवानाधारक दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर परवाना देण्यात यावा, ५ व १ हजार रूपयांचे मुद्रांक शासनाने बंद केले आहेत, आता १०० व ५०० रूपयांचे मुद्रांक बंद करण्याचा विचार असून हे मुद्रांक बंद करण्यात येवू नये, या मागण्यांसाठी दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला घेऊन संघटनेने शनिवारी (दि.७) दुय्यम निबंधक ए.के. नासरे, अप्पर तहसीलदार के.डी. मेश्राम तसेच दिवानी न्यायाधीश अनेकर यांना निवेदन देऊन आंदोलनाची सूचना दिली होती. त्यानंतर सोमवारपासून (दि.९) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे कळविण्यात आले आहे.
या आंदोलनात दस्तलेखक व मुद्रांक विके्रता संघटनेचे अध्यक्ष गोपाल कापसे, सचिव विरेंद्रसिंह यादव, उपाध्यक्ष नरेश गुरव, व्ही.डी. ठाकरे, ओ.डी. कटरे, संतप चिखलोंडे, विसराम पटले, शेरसिंह चिखलोंडे, सेवकराम डहारे, लक्ष्मण मलेवार, प्रदीप आष्टीकर, दुर्गाप्रसाद चिखलोंडे, अरूण उजवणे, विजय रंगारी, प्रमोद भदाडे, योगेंद्र पहिरे, यशवंत लिल्हारे, लक्ष्मीकांत फेंडारकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे ११० दस्तेलेखक व मुद्रांक विक्रेते सहभागी आहेत.

Web Title: Writer and Stamp Dealers' Exile Workshop Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.