एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा

By नरेश रहिले | Published: July 10, 2024 08:48 PM2024-07-10T20:48:43+5:302024-07-10T20:49:03+5:30

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.

Written exam of 10 candidates for one seat Selection of 1100 candidates, examination on 15th July | एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा

एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा


गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकुण ११० पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी १० उमेद्वारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी ११० जागा गोंदिया जिल्ह्यात असून यासाठी ११०० उमेद्वारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील नोटीस बोर्डवर तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिली आहे.

आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवस
लेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेद्वारांची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत कुणाला हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या कार्यालयाचे ईमेल sp.gondia@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात ११ जुलै २०२४ च्या रात्री ८ वाजतापर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

फुलचूरच्या आयटीआय येथे होणार लेखी परीक्षा
११० पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा औद्योगीक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), फुलचुर पेठ, गोंदिया येथे १५ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी हॉल टिकीटसह लेखी परीक्षेकरीता दुपारी १:३० वाजता प्रत्यक्ष हजर राहावे, असे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Written exam of 10 candidates for one seat Selection of 1100 candidates, examination on 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.