चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:43+5:302021-06-20T04:20:43+5:30

केशोरी : दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत शासनाच्या कला संचालनालयामार्फत एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा घेण्यात येते, परंतु यावर्षी ...

X marks will be given to the students of class X. | चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

googlenewsNext

केशोरी : दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत शासनाच्या कला संचालनालयामार्फत एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा घेण्यात येते, परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या चित्रकला परीक्षा घेण्यात आल्या नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. यावर शिक्षक भारती संघटनेचे आक्षेप घेऊन चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळण्याची मागणी केली होती. शिक्षक भारती संघटनेच्या मागणीची दखल घेऊन शासनाने एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कला संचालनालयाला एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही चित्रकला परीक्षा घेता आल्या नाही. त्यामुळे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाही, असे जाहीर केले होते. यावर शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी आक्षेप घेऊन चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करत पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण मिळणार किंवा नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांची दखल घेऊन शासनाचे एलिमेंटरी इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक जारी केला आहे. या परिपत्रकाचे शिक्षक भारती संघटना शाखा अर्जुनी-मोरगाव तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी स्वागत केले असून, विद्यार्थ्यांना या निर्णयापासून दिलासा मिळाला आहे.

Web Title: X marks will be given to the students of class X.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.