रंगारी यांना यंदाचा साहित्य सन्मान
By admin | Published: February 26, 2016 02:05 AM2016-02-26T02:05:10+5:302016-02-26T02:05:10+5:30
श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीचा यंदाचा साहित्य सन्मान युवा साहित्यकार प्रा. मिलिंद रंगारी यांना सोमवार (दि.२२) प्रदान करण्यात आला आहे.
सालेकसा : श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीचा यंदाचा साहित्य सन्मान युवा साहित्यकार प्रा. मिलिंद रंगारी यांना सोमवार (दि.२२) प्रदान करण्यात आला आहे.
झाडीबोली साहित्य मंडळांतर्गत पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या साहित्यकारांना हा पुरस्कार दिला जातो. मिलिंद रंगारी हे पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी झाडीपट्टी क्षेत्रातील जीवनशैली, राहणीमान, खानपान, संस्कृती, सामाजिक सलोखा, कौटुंबिक समस्या व तडजोड या विषयांना स्पर्श करीत अनेक लेख, नाटक, कविता यांची रचना केली आहे.
यासर्व बाबींचा विचार करत यंदा त्यांना साहित्य सन्मान प्रदान करण्यात आले. श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे श्री संत विदेही मोतीराम बाबा आत्मप्रवर्तक मंडळ भूगाव येथे पंढरपूर विठ्ठल रूखमाई मंदीर सभागृहात संत अमरत्न तवाडे बाबा यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. हेमकृष्ण कापगते आणि झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आरमोरीचे आ. कृष्णा गजबे, माजी आ. वसंत बोडें, माजी आ. अतुल देशकर, भंडारा जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, हृदय शल्य चिकीत्सक डॉ. पुरूषोत्तम देशपांडे, शिक्षण महर्षी डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, इंजि.उमाशंकर पर्वते, बिंदल अग्रवाल, सरपंच दुधराम बारस्कर, पोलीस पाटील माधुरी बारस्कर, हिरालाल झोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)