ये कोरोना है कातीलाना..... गीतातून जनजागृती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:18+5:302021-06-01T04:22:18+5:30

सालेकसा : विद्यमान परिस्थितीमध्ये गावात आणि गावातल्या प्रत्येकामध्ये कोरोना संक्रमणाविषयी सतर्कता आणि कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. शासनाकडून ...

Yeh corona hai katilana ..... geetatoon janajagruti () | ये कोरोना है कातीलाना..... गीतातून जनजागृती ()

ये कोरोना है कातीलाना..... गीतातून जनजागृती ()

Next

सालेकसा : विद्यमान परिस्थितीमध्ये गावात आणि गावातल्या प्रत्येकामध्ये कोरोना संक्रमणाविषयी सतर्कता आणि कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. शासनाकडून यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. कोरोनाविषयी ग्रामीण भागामध्ये अनभिज्ञता आणि गैरसमज कायम असून लसीकरणाविषयीसुद्धा लोक गंभीर नसल्याचे दिसत आहे. अशात पंचायत समिती सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे यांनी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी गीत संगीताचा मार्ग निवडला आहे. ‘ये कोरोना है कातीलाना’ या गीतातून जनजागृती केली जात आहे.

लोकांना संगीताच्या तालावर केलेले प्रबोधन लवकर कळते, अशात कोरोना जनजागृतीसाठी काही हटके करावे म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन कल्पना मांडली. एका चित्रपट गाण्याच्या ताल आणि बोलावर आधारित गीत लिहिण्याचे काम केले. जि. प. प्राथमिक शाळा पाऊलदौना येथील मुख्याध्यापक सी.जी. सोनवाने यांनी या गीताला शास्त्रीय आधार देत पदरचनेत मांडण्याचे काम केले. गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे यांनी या गीताला चित्रपटातील गीता प्रमाणे रचले आहे. जि.प. प्राथमिक शाळा दरेकसा येथील सहायक शिक्षक सुनीलकुमार सिंघाडे यांनी सूर ताल दिले आहे. सुनील कुमार सिंगाडे हे पेशाने एक शिक्षक असले तरी त्यांच्या अंगी संगीताचे गुण असून त्या गुणांचा उपयोग नेहमी आपल्या शिक्षण क्षेत्रासह समाजात जनजागृती करण्यासाठी करतात. कोरोनाविषयी नियम पाळणे व कुठलाही संशय न बाळगता लस लावून घ्यावी, यासाठी प्रत्येक गावात शिक्षकांना कामावर लावण्यात आले. शिक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता गावात प्रत्येक घरी जाऊन कोरोनाविषयक जनजागृती करीत आहेत. यामध्ये एक पाऊल पुढे टाकून काही शिक्षकांनी स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला आहे.

......

ये कोरोना है कातीलाना

पी.जी. सोनवाने यांनी जुना हिंदी चित्रपट ‘पाकिजा’मधील मौसम हे आशिकाना, या गाण्यावर आधारित कोरोना है कातीलाना, है जरुरत जनता को ऐसे मे टिका लगाना, मुखडा तयार करीत त्यातील प्रत्येक कडव्यात कोरोनाबद्दल जागृती आणणारे काव्यमय शब्द जोडण्याचे काम केले. याला अलंकारिक व साहित्यिक शब्दांचा साज चढविण्याचे काम एस. जी. वाघमारे यांनी केले. आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्याचे काम सुनील सिंगाडे यांनी केले आहे.

......

गावागावात जनजागृती

तालुक्यातील गावागावात जनजागृती करण्यासाठी सुनील सिंगाडे यांना सहकार्य करीत आहेत. यामध्ये पोवारीटोलाचे मुख्याध्यापक बी.जी. बुलाखे, दरेकसाचे मुख्याध्यापक एस. टी. लांजेवार, विचारपूरचे पदवीधर शिक्षक डी.एच. उके, हलबीटोलाचे सहायक शिक्षक एम.व्ही. मेश्राम, दरेकसाचे सहायक शिक्षक पी.आय. भारती यांचा समावेश आहे. लसीकरणासंबंधी जनजागृती करण्यासाठी पथक सहकार्य करीत आहे.

Web Title: Yeh corona hai katilana ..... geetatoon janajagruti ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.