विजेअभावी येरंडी गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:18+5:302021-06-20T04:20:18+5:30
गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात ...
गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात लक्ष देत नाहीत. परिसरातील लाईनमन आपला मोबाईल बंद करून ठेवतात. अभियंताही फोन उचलत नाही. यामुळे गावातील नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत.
अनेकदा तर कोणतेही काम नसताना वीज पुरवठा खंडित केला जातो. तर किरकोळ कामांसाठी अवघ्या गावाचा पुरवठा बंद केला जातो. मात्र बिल सारखेच येत नसल्याने गावकरी संतप्त आहेत. विशेष म्हणजे, सध्या ऑनलाईन क्सासेस सुरू असून, कधी रात्रभर, तर कधी अवघा दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांचे मोबाईल व लॅपटॉप चार्ज होत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसता येत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिवाय, विजेअभावी पाण्याची टाकी भरता येत नसल्याने गावाला पाणी पुरवठा पण होत नाही. विजेची समस्या सोडविण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.