येरे येरे पावसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 01:24 AM2017-06-23T01:24:17+5:302017-06-23T01:24:17+5:30

जून महिना अर्धा टोलूनही दमदार पाऊस बरसला नसल्याने सर्वांच्या आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाने दडी मारली

Yere yere rain ... | येरे येरे पावसा...

येरे येरे पावसा...

Next

सर्वांच्या नजरा आकाशाकडे : उकाडा झाला असह्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जून महिना अर्धा टोलूनही दमदार पाऊस बरसला नसल्याने सर्वांच्या आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाने दडी मारली असून सुर्यदेव आपले डोळे वटारत आहेत. त्यामुळे उकाडा आता असह्य होवू लागला असून येरे येरे पावसा...म्हणत सर्वच पावसाला बोलावत आहेत.
७ जून पासून मान्सून सुरू होतो व यंदा तर सुरूवातीपासूनच दमदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र जून महिना आता अंतीम टप्प्यात आला असून पावसाने हवामान खात्याचा अंदाज चूक ठरविला आहे. दररोज ढग दाटून येतात व निघून जातात मात्र पाऊस बरसण्याचे नाव घेत नाही. बुधवारपासून हलक्या सरी बरसून निघून जात आहे. पाऊस नसल्याने उकाडा वाढत आहे.

शेतीची कामे खोळबंली
पाऊस बरसत नसल्यामुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली असून खार टाकण्याची त्यांची तयारी आहे. मात्र खारीला पाऊस लागत असल्याने त्यांनी पावसाची वाट बघत खार टाकलेली नाही. आता दमदार पाऊस बरसेल व शेतात चांगले पाणी जमा झाल्यावर खार टाकण्याची तयारी दिसून येत आहे. अशात मात्र एक-एक दिवस लोटत चालला असून पाऊस बरसत नसल्याने शेतीची कामे खोळंबत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Web Title: Yere yere rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.