जिल्ह्यात योग ठिकठिकाणी थाटात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:11+5:302021-06-22T04:20:11+5:30
न. मा. द महाविद्यालय () गोंदियाः येथील न. मा. द. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डाॅ. ...
न. मा. द महाविद्यालय ()
गोंदियाः येथील न. मा. द. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात रासेयो माजी जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय योग दिवस रासेयो स्वयंसेवकांनी परिवारातील सदस्यांसोबत आपल्याच निवासस्थानी उत्साह वातावरणात साजरा केला. प्रा. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करीत मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या आक्रमणाने योग अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. योग साधनेचा मार्ग स्वीकारत अनेकांनी कोरोनाला चार हात लांब ठेवले असून, पोष्ट कोविड आजारावर देखील मात केली असल्याचे दिसून आले आहे असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार, ताड़ासन, वृक्षासन, त्रिकोडासन, हस्त पादासन, चक्र आसन, श्वासन प्राणायाममध्ये कपालभाती, भस्तीका, बाह्य कुम्भक, अंत कुम्भक, अनुलोम विलोम, उज्जाई, सूर्यभेदी, चंद्रभेदी, जसे लाभकारी आसन करुन जीवनात योग विषयक दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनविण्यासाठी प्रयत्न केले. संचालन जागृत सेलोकर याने केले. आभार चाहत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी देवेश्री मेश्राम, दीपाली फुंडे, ओम ठाकरे, दामिनी कटरे, प्रीती तिघरे, अश्विनी मुत्तेवार, आचल हुड, समिर गडपायले, आरजू राऊत यांनी सहकार्य केले.