स्वस्थ जीवनासाठी योग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:21 PM2017-11-14T23:21:26+5:302017-11-14T23:21:43+5:30
मधुमेहसारखे आजार समाजात भयंकर रूप धारण करीत आहेत. या आजारांना मुळासह नष्ट करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मधुमेहसारखे आजार समाजात भयंकर रूप धारण करीत आहेत. या आजारांना मुळासह नष्ट करण्याची गरज आहे. यासाठी योग हाच एकमेव उपचार असून स्वस्थ जीवनासाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी केले.
आरोग्य भारतीच्यावतीने मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत येथील आदर्श सिंधी विद्यालयात आयोजित योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. कार्यक्रमाला आदर्श सिंधी विद्या मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इंद्रकुमार होतचंदानी, आरोग्य भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत कटरे, गोंदिया शाखा उपाध्यक्ष डॉ. वंदना अलोनी, महासचिव डॉ. मंगेश सोनवाने, कोषाध्यक्ष विजय अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी होतचंदानी यांनी, अशा कार्यक्रमांची गरज असून संस्थेच्या माध्यमातून आरोग्य भारतीला सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात डॉ. कटरे यांनी, आरोग्य भारती सामाजीक व स्वयंसेवा संघटना राष्ट्रीयस्तरावर आरोग्य विषयक विविध उपक्रम घेत आहे.
यांतर्गत आरोग्य भारतीने तालुक्यातील टेमनी हे गाव दत्तक घेतले असून तेथे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. स्वस्थ व्यक्तीपासून स्वस्थ परिवार व स्वस्थ परिवारापासून स्वस्थ समाज व स्वस्थ राष्ट्र निर्मिती आरोग्य भारतीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलीस अधीक्षक भुजबळ यांना योग पुस्तिका भेट देण्यात आली.
संचालन डॉ. प्रिती कटरे यांनी केले. आभार डॉ. अलोनी यांनी मानले. येत्या १९ तारखेपर्यंत आयोजीत या शिबिरासाठी पुष्कर बारापात्रे, जागेश निमोणकर, जॉनी गोपलानी, प्रियंका नागपूरे, अनिल भागचंदानी, प्रशांत बोरकर, सुनील पृथ्यानी, डॉ.अमर गुप्ता, प्रताप आसवानी, अरूण नशिने, सुरज नशिने, राजेश गुप्ता, सुशांत कटरे आदी परिश्रम घेत आहे.