योग शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन- बडोले

By admin | Published: October 6, 2015 02:31 AM2015-10-06T02:31:20+5:302015-10-06T02:31:20+5:30

योग फक्त व्यायाम प्रकार नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. आमगावला राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंनी व

Yoga physical and spiritual advancement tools - Badolay | योग शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन- बडोले

योग शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन- बडोले

Next

आमगाव : योग फक्त व्यायाम प्रकार नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. आमगावला राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंनी व प्रेक्षकांनी यादृष्टीने योगासनाकडे बघावे. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे १७७ देशांमध्ये योगाचा प्रचार व प्रसार झाल्यामुळे भारताची प्रतिमा विश्वात पुन्हा चांगली होण्यास मदत झाली. या कार्यात माझे आपणास पूर्ण सहकार्य राहील, असे उद्गार सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
३४ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा उद्घाटन स्थानिक विजयालक्ष्मी सभागृहात झाले. या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. केशवराव क्षिरसागर होते. मंचावर सविता पुराम, डॉ. अरूण खोडस्कर, प्रमोद संगीडवार, सतिश मोहगावकर व स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप संघी उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींना महर्षी पतंजली राष्ट्रपिता महात्मा गांधी, लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांचा डॉ. दिलीप संघी, डॉ. खोडस्कर व सुरेश कोसरकर यांनी सत्कार केला. स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून ८०० खेळाडू, पंच, अधिकारी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत खेळांडूचा निवास व भोजन व्यवस्था लक्ष्मणराव मानकर गुरूजी शैक्षणिक संकुलात करण्यात आली.
संचालन विभागीय उपाध्यक्ष विनायक अंजनकर यांनी केले. स्पर्धेसाठी अध्यक्ष सुरेश कोसरकर, सचिव शशांक कोसरकर, प्रा. रंजीत कुमार डे, बेनीमाधन कावळे, भरत चुटे, डी.आर. मेश्राम, झनक बघेले, सुभाष मेश्राम, नरेंद्र कावळे, के.टी. बिसेन, हेमंत चावके, नितेश चुटे, अशोक मोदी, बालाप्रसाद दुबे, निखिल कोसरकर, योगेश कावळे, रवी आचार्य, जगदिश बडगे, खेमचंद शहारे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Yoga physical and spiritual advancement tools - Badolay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.