योग जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो (योग)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:13+5:302021-06-22T04:20:13+5:30
गोंदिया : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीत एक असून, भारताने जगाला खूप काही दिले आहे. यातीलच योग एक ...
गोंदिया : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीत एक असून, भारताने जगाला खूप काही दिले आहे. यातीलच योग एक असून, योगाला आज भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर ख्याती मिळाली आहे. योग जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करीत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.
भारतीय जनता पक्ष व आमदार डॉ. परिणय फुके मित्र परिवारच्यावतीने गणेशनगर परिसरातील रानीसती मंदिर सभागृहात आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी जनभरातील लोकांनी आज योगाला आपल्या जीवनशैलीतील एक भाग बनविला आहे. शरीराला स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी योगापेक्षा उत्तम काही नाही. योग शारीरिक शक्ती वाढविण्यासोबतच आम्हाला तंदुरूस्त ठेवतो, असे सांगितले. याप्रसंगी मेघा ठाकरे यांनी उपस्थितांना योगाभ्यास करविला. याप्रसंगी भरत क्षत्रिय, डॉ. प्रशांत कटरे, गजेंद्र फुंडे, राजकुमार कुथे, सुनील केलनका, बंटी पंचबुद्धे, संजीव कुलकर्णी, शंभुशरण सिंह ठाकूर, जयंत शुक्ला, आत्माराम दसरे, छाया दसरे, पलाश लालवानी, धर्मेंद्र डोहरे, भावना कदम, मैथुला बिसेन, मौसमी सोनक्षात्रा, शालिनी डोंगरे, गोल्डी गावंडे, मिलिंद बागड़े, अशोक जयसिंघानसह, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.