योगामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

By admin | Published: June 22, 2015 12:34 AM2015-06-22T00:34:21+5:302015-06-22T00:34:21+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात सर्वत्र उत्साहरात साजरा केला जात असतानाच ..

Yoga will help to increase efficiency | योगामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

योगामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

Next

विजय सूर्यवंशी : आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
गोंदिया : आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात सर्वत्र उत्साहरात साजरा केला जात असतानाच यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयानेही भाग घेतला. योगदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची योगासने केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी योगासने करावीत. योगासनामुळे कार्यक्षमता वाढण्यात मदत होते. अनेक कामे वेळीच पार पाडता येतात. योगासनामुळे मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते आणि काम करण्यास उत्साह निर्माण होतो. त्यामुळे कामे वेळीच पार पाडण्यास मदत होते.
याप्रसंगी पतंजलीचे योग प्रशिक्षक अशोक मिश्रा व उषा वाजपेयी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारची योगासने करवून घेतली व योगासनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहीते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे व अन्य उपस्थित होते. विशेष म्हणजे योगदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांसह विविध सामाजीक संस्थांनीही पुढाकार घेत योगदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (शहर प्रतिनिधी)
योग दिनानिमित्त सायकल रॅली
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे क्रीडा विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी व प्राध्यापक ललीत जिवानी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ही रॅली इंदिरा गांधी स्टेडियम, काले खा चौक, पाल चौक, मनोहर चौक, रामनगर बाजार चौक, यादव चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत निघाली व रॅलीचा समारोप इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक अरुणा गंधे, भोजराज चौधरी, क्रीडा शिक्षक विशाल ठाकूर, राठोड, चेतन मानकर, आलोक तुरकर, अनमोल गंधे, दुलीचंद मेश्राम, पंकज पांडे व पार्टीन यांनी सहकार्य केले.

Web Title: Yoga will help to increase efficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.