दवाखान्याच्या खर्चासाठी तरुणाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:46+5:302021-05-04T04:12:46+5:30

तो आपल्या गावी जातो म्हणून आपल्या बहिणीला व भाऊजीला सांगून २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता ...

Young man commits suicide for hospital expenses | दवाखान्याच्या खर्चासाठी तरुणाने केली आत्महत्या

दवाखान्याच्या खर्चासाठी तरुणाने केली आत्महत्या

Next

तो आपल्या गावी जातो म्हणून आपल्या बहिणीला व भाऊजीला सांगून २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता वडेगाव बंध्या येथून निघाला होता. तो बहिणीच्या घरून निघाला; परंतु आपल्या घरी पोहोचलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली. २ मे रोजी सकाळी ७.३० वाजता बाेळदे येथील शेतावर जाणाऱ्या मजुरांनी एका इसमाचा मृतदेह विहिरीत असल्याचे सांगितले. हेमराज कुंभरे (३५), रा. अर्जुनी-मोरगाव यांनी या संदर्भात केशोरी पोलिसांत तक्रार केली. दिनेश नारायण परतेकी (२१), रा. एकलपूर वडसा, जि. गडचिरोली याचा मागील आठवड्यात अपघात झाल्याने दवाखान्याच्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे, या चिंतेत तो होता. त्याने ही गोष्ट मनावर घेऊन बोळदे येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. केशोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार निकाडे करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide for hospital expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.