समाज जोडण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:04 PM2018-03-18T22:04:36+5:302018-03-18T22:04:36+5:30
सध्याच्या काळात समाजविषयक आपुलकी लुप्त होत चालली आहे. बंधूभावाच्या भावनेने समाज एकवटण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नेहमी तत्पर रहावे.
ऑनलाईन लोकमत
साखरीटोला : सध्याच्या काळात समाजविषयक आपुलकी लुप्त होत चालली आहे. बंधूभावाच्या भावनेने समाज एकवटण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नेहमी तत्पर रहावे. तसेच समाजामध्ये वावरणाऱ्या तरूणाईने समाज जोडण्यात विशेष पुढकार घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ मंत्री महादेवराव शिवणकर यांनी केले.
येथील युवा कुणबी समाज सेवा समितीवतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज समारंभ तसेच स्व. जगन दोनोडे व स्व. गंगाबाई दोनोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्यामलाल दोनोडे यांनी कुणबी समाजासाठी दान दिलेल्या जागेवरील कुणबी समाज भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री भरत बहेकार होते. पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती सुनंदा बहेकार, लिलाधर पाथोडे, प्रमोद येटरे, तिरथ येटरे, शामालाल दोनोडे, तुकाराम बोहरे, संजू दोनोडे, सुभाष बागडे, प्रभाकर दोनोडे, भुमेश्वर मेंढे, कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम चुटे, राजू काळे, कृष्ण हुकरे, अनिल शिवणकर, रविशंकर हत्तीमारे, संजय ओकटे, राजकुमार फुंडे, गिरजाशंकर मेंढे, रमेश बहेकार, डॉ. रमेश बोहरे, देवराज खोटेले, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, प्रभू थेर, अनिल फुंडे, लेकराम भूते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात संत तुकाराम महाराज व रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली.
या वेळी पाहुण्यांच्या हस्ते राजकीय क्षेत्रात भरारी घेणाºया विविध व्यक्तींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात कुणबी समाजाच्या युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले आहे. तसेच १५ एप्रिल रोजी होणाऱ्या कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यावर विशेष चर्चा करण्यात आली आहे. समाजासाठी जमीन दान देणाºया श्यामलाल दोनोडे यांचे उपस्थित पाहुण्यांनी विशेष आभार मानले.
संचालन युवा कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी केले. आभार पवन पाथोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पृथ्वीराज शिवणकर, संतोष बोहरे, नामदेव दोनोडे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, पुरुषोत्तम कोरे, संजय बागडे, चंद्रकुमार बहेकार, देवेंद्र मुनेश्वर, मोहन दोनोडे, प्रेमलाल ठाकरे, योगेश बहेकार, प्रल्हाद मेेंढे, नंदू चुटे यांनी सहकार्य केले.