तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे पूजन करावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 AM2021-02-26T04:41:52+5:302021-02-26T04:41:52+5:30
ठाणा :छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्यावतीने ठाणा येथे सोमवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ...
ठाणा :छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्यावतीने ठाणा येथे सोमवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.डी.मेश्राम होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य सी.जी. पाऊलझगडे होते. यावेळी मंचावर डॉ. गोपाल हनवते, सरपंच छाया देशकर, उपसरपंच विजय बनकर, ग्रामपंचायत सदस्य हिरा खोब्रागडे, गुणवंता भेलावे, रेखा बनकर, सुखदेव महापात्रे, चंद्रभान पारधी, महारवाडे, वंजारी, अवचरे, मुख्याध्यापक गजबे, परशुराम कटरे, प्रमोद वंजारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पाऊलझगडे यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे पूजन करुन ते आचरणात आणावे. संपूर्ण इतिहासातील असंख्य उदाहरणाद्वारे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी हेमंत लिल्हारे, मुन्ना गवळी, मनिष चौरागडे यांनीही विचार व्यक्त केले. व्ही.डी.मेश्राम यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश सोनवाने यांनी मांडले. संचालन सोहन सोनवाने यांनी केले. सकाळी ढोलताशांच्या गजरात पालखी काढण्यात आली. यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी नितेश महारवाडे, शुभम कावळे, प्रशांत देशकर, विरेंद्र बनकर, अलगा आग्रे, गणेश मेहर, नितेश शहारे, विनू कोडमडवार, आभास पारधी, सुरेंद्र उईके, भारत नागरिकर, किरण बोपचे यांनी सहकार्य केले.