जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 04:15 PM2021-10-19T16:15:54+5:302021-10-19T16:33:34+5:30

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे.

Youngsters are also among the top recipients of second dose including vaccination | जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

Next
ठळक मुद्दे१,०६,५२७ तरुणांनी टोलवला दुसरा डोस : वृद्धांमध्ये तेवढेच गांभीर्य

कपिल केकत

गोंदिया : शंभर टक्के लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच, जिल्ह्यात लसीकरणात अव्वल असलेली तरुणाई मुदत निघून गेल्यानंतर दुसरा डोस टोलविण्यातही अव्वल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १८-४४ गटात तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस टोलविल्याचे बुधवारपर्यंतच्या (दि.१३) आकडेवारीतून दिसून येत आहे, तर दुसरीकडेच वृद्धांमध्ये कोरोनाला घेऊन जास्त गांभीर्य दिसून येत असतानाच, ३९,२७१ वृद्धांनी दुसरा डोस टोलविल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही डोक्यात घर करून बसला आहे. कोरोनामुळे वृद्धांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात असतानाच, दुसऱ्या लाटेने तरुणांना सर्वाधिक लक्ष्य बनविल्याचे दिसून आले. अवघ्या देशात निर्माण झालेली ही स्थिती आता पुढे कधीच येऊ नये, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यात त्यानुसार प्रत्येकाच्या लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. हेच कारण आहे की, जिल्ह्यात १२,५७,८४६ डोसेस लावण्यात आले आहेत.

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन सर्वाधिक उत्सुक असलेल्या व लसीकरणात आघाडीवर असलेल्या १८-४४ गटांतील तरुणाईच दुसरा डोस टोलवण्यातही अव्वल आहे. या गटात बुधवारपर्यंत तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सुरुवातीला लसीकरणाची मागणी करणारा हा गट आता कोरोना नियंत्रणात असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्यापासून संपर्कातील व्यक्तीला कोरोना होत नाही, शिवाय आपण कोरोनाची लागण होऊनही त्याच्या गंभीर परिणामांपासून वाचून राहतो. अशात लस घेऊनच आपण सुरक्षित राहून अन्य लोकांना बाधित करणार नसल्याने, यातूनच कोरोनाचा नायनाट होणार आहे. यामुळे सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय आहे.

दुर्लक्षितपणाच दुसऱ्या लाटेला कारणीभूत

कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा आपल्या हाती लस नव्हती व कोरोनाने पाहिजे तेवढी क्षती केली. मात्र, दुसरी लाट आली, तेव्हा देशात लसीकरण सुरू झाले होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला डाव साधून पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर हानी केली व सर्वाधिक तरुणांना गिळले. मात्र, त्यानंतर आता लस टाळून तोच दुर्लक्षितपणा केला जात असल्याचे दिसत आहे.

Web Title: Youngsters are also among the top recipients of second dose including vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.