तरुणांनी कबड्डीसारख्या स्वदेशी खेळांना अंगिकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:54 AM2021-02-18T04:54:00+5:302021-02-18T04:54:00+5:30
देवरी : आपल्या देशात अनेक स्वदेशी खेळांचा उगम झाला आहे. अशा खेळातून शारीरिक व्यायाम व शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे ...
देवरी : आपल्या देशात अनेक स्वदेशी खेळांचा उगम झाला आहे. अशा खेळातून शारीरिक व्यायाम व शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होत असल्याने स्वदेशी खेळांना आज महत्व आहे. परंतु धावत्या युगात मैदाने ओस पडताना दिसू लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे आजची तरुण पिढी आपल्या हातात मोबाईल घेऊन तासनतास घरात एकच ठिकाणी बसू लागली आहे. परंतु दर्रोटोला येथील तरुणांनी प्रौढ कबड्डी स्पर्धा आयोजित करून या भागातील तरुण पिढीला एक संधी उपलब्ध करून दिली. कबड्डीसारखे खेळ हे आपल्या मातीचे खेळ आहेत. हा खेळ खेळण्याकरिता ताकद, हिंमत व कौशल्य लागते. या सर्व गोष्टी या भागातील तरुणांमध्ये आहेत. त्यामुळे येथील तरुणांनी कबड्डीसारख्या स्वदेशी खेळांना अंगिकारावे, असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम दर्रोटोला (भर्रेगाव) येथील आदिवासी नवयुवक क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी (दि. १४) आयोजित एक दिवसीय प्रौढ क्लोज कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया होते. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, भर्रेगावचे सरपंच लखनलाल पंधरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव आचले, माजी सरपंच विद्या खोटेले, माजी उपसरपंच मनोज मिरी, ग्रामपंचायत सदस्य संगीता दर्रो, नंदु नेताम, योगराज साखरे, रिता सलामे, जयंद्र मेंढे, मदन रहिले, अरविंद शेंडे, सुरजलाल उसेंडी, एकनाथ राऊत, प्रल्हाद सलामे, तुकाराम पंधरे, मुन्नी उसेंडी, पंकज शहारे उपस्थित होते. प्रास्ताविक आचले यांनी केले. खुशाल कुंभरे यांनी संचालन केले. प्यारेलाल वर्चो यांनी आभार मानले.