पांगोलीच्या तीरावर टेमनीतील युवकांची स्वच्छता मोहीम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:30+5:302021-09-24T04:34:30+5:30

गोंदिया : गणेश विसर्जनानिमित्त पांगोलीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात जमा झालेले निर्माल्य स्वच्छता मोहीम राबवून टेमनी येथील युवकांनी स्वच्छ ...

Youth cleaning campaign on the shores of Pangoli () | पांगोलीच्या तीरावर टेमनीतील युवकांची स्वच्छता मोहीम ()

पांगोलीच्या तीरावर टेमनीतील युवकांची स्वच्छता मोहीम ()

Next

गोंदिया : गणेश विसर्जनानिमित्त पांगोलीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात जमा झालेले निर्माल्य स्वच्छता मोहीम राबवून टेमनी येथील युवकांनी स्वच्छ केले. त्यांनी केलेल्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोंदिया शहरातील गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी लागूनच असलेल्या टेमनीच्या पांगोली तीरावर येत असतात. यावर्षी सुद्धा या काठावर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जनासाठी आल्या. मूर्ती विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माल्य,केरकचरा तसेच इतर साहित्य जमा होत असते. हे साहित्य तसेच ठेवून नागरिक आपल्या घराला निघून जातात. त्यामुळे नदी परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य व केरकचरा जमा झाला होता. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जमा झालेले निर्माल्य येथील मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बानेवार, दुर्योधन वंजारी, सुधाकर मारबदे,राजू टेकाम, रजनीश वंजारी, सुनील मरसकोल्हे, गिरीशंकर नेवारे,दीपेश्वर मारबदे, राहुल सहारे, मुन्ना सहारे,सतीश बानेवार, हिरालाल बागडे, शैलेंद्र मालगाम,जितेंद्र सहारे, इंद्रराज सहारे, स्वराज मलगाम, यांनी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसरातील घाण कचरा जमा केले व संपूर्ण पांगोलीचा परिसर स्वच्छ केला.

Web Title: Youth cleaning campaign on the shores of Pangoli ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.