समाजासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:32+5:30

समाजासाठी एकजुट होऊन कार्य करण्याची गरज नेहमीच असते. विशेष म्हणजे, आता समाजाच्या विकासासाठी युवांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार तसेच श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले.

Youth need to come forward for the community | समाजासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज

समाजासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गुजराती समाजाचे दिवाळी मिलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोणताही समाज त्या समाजातील नागरिकांची एकी शिवाय मजबूत होत नाही. त्यामुळे समाजासाठी एकजुट होऊन कार्य करण्याची गरज नेहमीच असते. विशेष म्हणजे, आता समाजाच्या विकासासाठी युवांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार तसेच श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले.
श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ व गुजराती समाजाच्या संयुक्तवतीने २८ आॅक्टोबर रोजी आयोजित दिवाळी मीलन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी ट्रस्टी दिपम पटेल, विजय सेठ, जयंत जसानी, सहसचिव विजय जोशी, चंद्रेश माधवानी, प्रजय पटेल, अवनेश मेहता, सुधीर राठोड, वीपीन बाविसी, ललित जिवानी, सुरेश पारेख, हसमुख पटेल, दिनेश पटेल, मुकेश पटेल, दिनेश पटेल, निलेश पटेल, प्रफुल चावडा, पिनल पटेल, विशाल चंदाराणा, चिराग पटेल, अतुल पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिष्यवृत्ती तसेच शाळांच्या विकासासाठी नवीन अभ्यासक्रमावर जोर दिला. तसेच आधुनिक प्ले ग्रूप व अभ्यासक्रमांशी संबंधित सुविधा वाढविण्याबाबत सांगीतले. तर जयेश पटेल यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. संचालन मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी केले. आभार सहसचिव विजय जोशी यांनी मानले.
पश्चात, महिलांचा दिवाळी मिलन समारंभ घेण्यात आला. यात वर्षा पटेल यांनी समाजबांधवांनी एकत्रीत होण्यासाठी पे्ररीत के ले. याप्रसंगी खुशाली पटेल, यशस्वी पटेल, श्वेता वडेरा, मीरा वडेरा यांच्यासह मोठ्या संख्येत समाजातील महिला उपस्थित होत्या.
संचालन किंजल मेहता यांनी केले. आभार पायल पटेल यांनी मानले.

Web Title: Youth need to come forward for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.