तालुकास्तरीय स्वच्छ ग्राम-हरीत ग्राम अभियानात नोंदविला युवकांनी सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:32+5:302021-03-10T04:29:32+5:30

यावेळी मान्यवर मंडळींनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे व शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे, याविषयी चिंता व्यक्त केली. ...

Youth participation in taluka level clean village-green village campaign | तालुकास्तरीय स्वच्छ ग्राम-हरीत ग्राम अभियानात नोंदविला युवकांनी सहभाग

तालुकास्तरीय स्वच्छ ग्राम-हरीत ग्राम अभियानात नोंदविला युवकांनी सहभाग

googlenewsNext

यावेळी मान्यवर मंडळींनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे व शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे, याविषयी चिंता व्यक्त केली. शिंदे यांनी, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली जाणार आहे व भविष्यात हलबिटोला गाव स्मार्ट बनेल, अशी आशा व्यक्त केली. शौचालय बांधून त्यांचा वापर आपण नेहमीच केला पाहिजे. नाही तर आपल्याच घरातील महिला बाहेर बसल्यावर त्यांना होणाऱ्या अपमानास पुरुषदेखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. प्रत्येकाला आपले कुटुंब निरोगी रहावे, असे वाटत असेल तर शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावात घाण होणार नाही व रोग निर्माण होणार नाही, तसेच सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करा व आपले गाव सांडपाणीमुक्त गाव करा, यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे तरच आपले गाव स्वच्छ गाव, या नावाने ओळखले जाईल, असे मत व्यक्त केले.

Web Title: Youth participation in taluka level clean village-green village campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.