युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:08+5:302021-02-23T04:45:08+5:30

बाराभाटी : असंख्य मावळे एकत्र करून शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यात कुठलीच विषमता नव्हती, जातीचा, समाजाचा भेदाभेद केला नाही. ...

Youth should assimilate the thoughts of Shivaraya () | युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे ()

युवकांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे ()

Next

बाराभाटी : असंख्य मावळे एकत्र करून शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यात कुठलीच विषमता नव्हती, जातीचा, समाजाचा भेदाभेद केला नाही. अशा शिलवान शिवाजी राजाचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करून नवा आदर्श घडवावा, असे प्रतिपादन संस्थापक-सचिव दिलीप रामटेके यांनी केले.

स्थानिक अक्षरा सामाजिक संस्थेत शिव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे भीमराव मेश्राम, रिना रामटेके, वैभव गजभिये, हर्षानंद रामटेके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामटेके म्हणाले, ‘शिवबांची शिकवण ही समाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे. स्त्रीचा आदर करणे खरे तर शिवरायांनी सन्मानपूर्वक शिकविल्याचे सांगितले.’ कार्यक्रमाचे संचालन व आभार आर.डी.रामटेके यांनी केले.

Web Title: Youth should assimilate the thoughts of Shivaraya ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.