युवा मोर्चा हीच पक्षाची खरी ताकत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:56+5:302021-08-14T04:33:56+5:30
गोरेगाव : युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता स्वाभिमानानाने कार्य करावे. आजचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता उद्याचा पक्षाचा युवा नेता आहे. ...
गोरेगाव : युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता स्वाभिमानानाने कार्य करावे. आजचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता उद्याचा पक्षाचा युवा नेता आहे. कारण युवा मोर्चा हीच पक्षाची खरी ताकत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी केले.
तालुक्यातील मांडोबाई देवस्थान येथे आयोजित भाजपच्या संघटनात्मक बैठक व युवा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी संघटन मंत्री अरविंद शाहपूरकर, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, संजय कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बादल कुलकर्णी, प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, पूर्व विदर्भ समन्वयक वामन तुरके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, लक्ष्मण भगत, जगनित, विश्वजीत डोंगरे, जिल्हा महामंत्री हर्ष मोदी ललित, मानकर, कुणाल बिसेन, पारस पुरोहित, गुड्डू चांदवानी, तिजेश गौतम उपस्थित होते. बैठकीत अनेक संघटनात्मक व विस्तारित बाबींवर चर्चा करून प्रकाश टाकला. संचालन युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी यांनी केले. आभार युवा मोर्चा आत्मनिर्भर भारतचे संयोजक तिजेश गौतम यांनी मानले. बैठकीसाठी फनिंद्र पटले, होमराज पुस्तोडे, गौरेश बावनकर, सनी बघेले, विवेक चौधरी, कौशल ठाकूर, टिनू टेंभरे, संदीप राहंगडाले, अंशुल बिसेन, विनोद पटले, आदित्य शर्मा, बाला वहिले, अमोल तितरमारे, विवेक खंडायत, प्रवीण बोपचे, इंद्रजीत भाटिया, आकाश जैतवार, निमेश दमाहे, तुकाराम राणे, दिलेश सोनटक्के, शिशुपाल रहांगडाले, रवी मुटकुरे, दिशांत चन्ने, नितेश हिंगे, रमेश लांजेवार, रवी पटले, मनोज बोपचे, पंकज कोटांगले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.