जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गोंधळात
By admin | Published: February 23, 2016 02:11 AM2016-02-23T02:11:38+5:302016-02-23T02:11:38+5:30
मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेत सोमवारी आयोजित अर्थसंकल्प सभेचा गोंधळातच शेवट झाला. दुपारी १
गोंदिया : मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेत सोमवारी आयोजित अर्थसंकल्प सभेचा गोंधळातच शेवट झाला. दुपारी १ वाजतापासून रात्री ७.४५ वाजेपर्यंत चाललेल्या या सभेत २०१६-१७ करिता ९ कोटी २७ लाख २५ हजार ४०० रुपयांच्या संभाव्य खर्चाला सत्ताधारी पक्षांनी बहुमताच्या आधारे मंजुरी दिली.
दुपारी १ वाजता सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे होत्या. याशिवाय जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
आधी २०१५-१६ च्या सुधारित अर्थसंकल्पावर चर्चा होऊन ७ कोटी ८९ लाख ९८ हजार २८० रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१६-१७ च्या संभाव्य खर्चावर चर्चा झाली.
यावेळी संकीर्ण ठेवीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता गंगाधर परशुरामकर व इतर विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. मात्र वित्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. यावेळी आरोग्य व शिक्षणावरील खर्चात वाढ करण्याचीही मागणी विरोधकांनी केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत हा अर्थसंकल्प पारित करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)