जिल्हा परिषदेच्या ६३४ वर्ग खोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:10 PM2018-04-16T22:10:39+5:302018-04-16T22:10:39+5:30

Zilla Parishad's 634 class rooms are dangerous | जिल्हा परिषदेच्या ६३४ वर्ग खोल्या धोकादायक

जिल्हा परिषदेच्या ६३४ वर्ग खोल्या धोकादायक

Next
ठळक मुद्देयुडायसचा अहवाल : ३५४ शाळेतील ५६७ खोल्यांची करावी लागणार दुरूस्ती

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा संकल्प केला असला तरी भौतिक सुविधेअभावी पाहिजे त्या प्रमाणात जि.प. शाळांचा उत्थान होऊ शकला नाही. आजही गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ६३४ वर्ग खोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहेत. असा अहवाल यंदाच्या युडायसनुसार तयार करण्यात आला आहे.
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजीटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही स्मार्ट व्हावा यासाठी गोंदियाच्या शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. भौतिक सुविधेसाठी गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम सुरूच ठेवला. परंतु अपुऱ्या निधीमुळे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६३४ वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत, अशी कबुली गोंदिया जिल्हा परिषद देत आहे. दोन वर्षापूर्वी तिरोडा तालुक्याच्या ठाणेगाव येथील विद्यार्थ्याचा वर्गखोलीचे छत कोसळल्याने शाळेतच मृत्यू झाला होता.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. मात्र यानंतरही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे. पालकांचा आपल्या पाल्यांकडे असणाऱ्या दुर्लक्षामुळे त्या विद्यार्थ्यांवर कधी संकट कोसळेल याचा नेम नाही. जिल्ह्यात २३० अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज आहे.

विद्यार्थ्यांसाठी ३५६ शौचालयांची गरज
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये असा गाजावाजा केला जातो. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी शौचालय नाहीत. ज्या ठिकाणी शौचालय आहेत ते शौचालय वापरायोग्य नाही. मुलांचे १९९ तर मुलींचे १५७ शौचालय वापरायोग्य नाही किंवा शौचालय नाहीत अशी अवस्था आहे.
८८ शाळांत वीज नाही
गोंदिया जिल्हा डिजीटल जिल्हा म्हणून राज्यात दुसºया क्रमांकावर आला. त्यासाठी राज्यपालाने येथील शिक्षण विभागाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. परंतु डिजीटल जिल्हा झाला म्हणून ज्या गोंदिया जिल्ह्याचा गौरव झाला त्या जिल्ह्यातील १०६५ पैकी ८८ शाळांतील वीज पुरवठा अद्यापही खंडीत आहे. विद्युतची सोय नसतानाही जिल्हा डिजीटल झाल्याचे सांगून शिक्षण विभाग पाठ थोपाटून घेत आहे.

Web Title: Zilla Parishad's 634 class rooms are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.