जि.प.चा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:12+5:30
१ ते १५ जानेवारीपर्यत केंद्र स्तरावर तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता जिल्हा परिषदेकडून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी निधी देखील समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दरवर्षी स्वदेशी खेळोत्तजक मंडळातंर्गत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा शिक्षकांनी तीन दिवसाचे संपकालीन वेतन द्यावे, अन्यथा स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
१ ते १५ जानेवारीपर्यत केंद्र स्तरावर तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता जिल्हा परिषदेकडून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी निधी देखील समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.
सन १९३८ पासून संयुक्त भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत गोंदिया असताना स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या नियंत्रणाखाली प्राथमिक शिक्षण विभागात क्र ीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर केले जात होते. गोंदिया जिल्हा अस्तित्त्वात आल्यानंतर जिल्हा स्वदेशी खेळोत्तेजक मंडळातर्फे आयोजित केले जात होते. यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करून दिला जात होता. जि.प.कार्यरत शिक्षकांनी जोपर्यंत आंदोलन काळातील वेतन काढण्यात येणार नाही, तोपर्यत स्व.खे.मंडळाची निवडणूक घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये चांगलीच चर्चा झाली. ज्या मंडळाशी जिल्हा परिषदेचे काहीही देणे घेणे नाही. त्या मंडळाकडून महोत्सव आयोजित करण्याचे कारणच नाही, असा निस्कर्ष काढण्यात आला. ७ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या सभेत आगामी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प.शिक्षणाधिकारी यांनी २४ डिसेंबर रोजी पत्राच्या माध्यमातून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना केंद्रस्तरावर
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०१९ साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. १ ते १५ जानेवारी २०२० दरम्यान केंद्रस्तरीय तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्याची सूचना केली आहे. महोत्सवातील स्पर्धा महाराष्ट्र सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियमावलीनुसार घ्यावे असेही कळविले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेकडून महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
महोत्सवासाठी २२ लाख रुपयांचा निधी
जिल्हा परिषदे अंतर्गत ८ पंचायत समिती आहेत.सर्व पंचायत समिती मिळून जिल्ह्यात एकूण ८८ केंद्र आहेत. या ठिकाणी केंद्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून महोत्सवासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचे समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.
स्पर्धा व कार्यक्रमांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण
केंद्रस्तरावर होणाºया महोत्सवाचे आयोजन शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली होणार आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व साधन व्यक्ती हे यात महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
स्वदेशी खेळोत्तेजक मंडळावर प्रश्नचिन्ह
१९३८ मध्ये भंडारा जिल्हा परिषद असताना स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या नियंत्रणाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जात होते. आधीही गावकºयांच्या सहकार्याने आयोजन केले जात होते. कालांतराने यासाठी जिल्हा परिषदेकडून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे स्व.खे.मंडळाला फार महत्त्व आले होते. स्व.खे.मंडळाच्या कार्यवाहपदाबाबत शिक्षकांमध्ये चांगलेच राजकारण होत होते. आता शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याने स्वदेशी खेळोत्तेजक मंडळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.