जि.प. शिक्षकांना मिळणार १ तारखेला वेतन

By Admin | Published: August 17, 2015 01:43 AM2015-08-17T01:43:33+5:302015-08-17T01:43:33+5:30

शिक्षकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कक्षात आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत सहविचार सभा गुरूवार पार पडली.

Zip Teachers will get salary at 1 st date | जि.प. शिक्षकांना मिळणार १ तारखेला वेतन

जि.प. शिक्षकांना मिळणार १ तारखेला वेतन

googlenewsNext

नागो गाणार : आदेशाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची मान्यता रद्द होणार
गोंदिया : शिक्षकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कक्षात आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत सहविचार सभा गुरूवार पार पडली. यात जि.प. शाळांतील शिक्षकांच्या वेतनाबाबत चर्चा झाली. त्यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यापुढे दरमहा १ तारखेला वेतन देण्याचे मान्य केले.
सदर सहविचार सभेत सर्वप्रथम वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता, मासिक पे स्लिप आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता न देणाऱ्या व शिक्षणाधिकारी यांचे आदेश वेळोवेळी पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची सुनावणी आयोजित करण्यात आली. तसेच त्यांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. तर एका शाळेच्या मुख्याध्यापकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सभेतच घेण्यात आला.
वेतनाबाबत झालेल्या चर्चेत शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे मान्य केले. सोबतच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या इतर प्रश्नांवरही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सभेला शिक्षणाधिकारी खंडागळे, पाटील, उपशिक्षणाधिकारी मोहबंशी, वरिष्ठ लेखा परीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी नीताराम अंबुले, सतीश मंत्री, लीलेश्वर बोरकर, राधेश्याम पंचबुद्धे, सनत मुरकुटे, चरणदास डहारे, गुणेश्वर फुंडे, कृष्णा देशमुख, सी.एस. बिसने, ईश्वर टेंभरे, भागवत बडोले, मनोज डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या अनेक समस्या कायमच
आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे दर महिन्याच्या १ तारखेला सर्व शिक्षकांचे वेतन होतील, असे सर्वच शिक्षकांना वाटत होते. मात्र ही आॅनलाईन वेतन प्रणालीच त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. एक तारीख तर सोडाच महिन्याचे १० दिवस लोटूनही शिक्षकांना वेतन होत नव्हते. त्यामुळे वेतन वेळेवर न होणे ही त्यांची प्रमुख समस्या होती. आता वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता, मासिक पे स्लिप आदींच्याही समस्या कायमच होत्या. या सर्व प्रकाराबाबत आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर शिक्षक परिषदेने चर्चा घडवून आणली.
१९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत
गोरेगाव : तालुक्यातील १९१ शिक्षकांनी २००९-१० या वर्षात प्रवास रजा सवलत घेतली होती. पण यावर पीआरसीने आक्षेप नोंदविल्याने त्या १९१ शिक्षकांवर कारवाई करत त्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ थांबविली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेतनवाढ पूर्ववत करण्याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाशी चर्चा करून मागणी करण्यात आली होती. यावर शुक्रवारी जि.प. गोंदियाने त्या १९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत करण्याचे पंचायत समितीला आदेश दिले. सदर प्रकरणात शिक्षक संघाच्या वतीने खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे व गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांच्यासोबत चर्चा करून वेतनवाढ त्वरित करण्याची मागणी करण्यात आली होती. शिष्टमंडळात केंद्रप्रमुख जी.जे. बिसेन, तालुका संयोजक शंकर चव्हाण, ए.डी. पठाण, एफ.एम. बिसेन, पी.आय. गौंधर्य, वाय.बी. पटले, पोमेश येळे, चैतराम कायलारे, एन.के. बिसेन, डब्ल्यू.एच. रहांगडाले, व्ही.आर. रहांगडाले, पी.झेड. पटले, अंगद कुंडगीर, एफ.जे. प् ाठाण, राहुल कळंबे, रमेश बिसेन, डी.डी. बिसेन उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Zip Teachers will get salary at 1 st date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.