झाडीपट्टीच्या जान्हवीचे रुपेरी पडद्यांवर पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:52 PM2019-01-31T21:52:56+5:302019-01-31T21:53:30+5:30

चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. त्यात संस्कृतीचे दर्शन होत असते. ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. कुठलाही निर्माता, दिग्दर्शक आपल्या चित्रपटाविषयी आशावादी असतो. प्रत्येक चित्रपटाच्या कथानकांमध्ये कुठेतरी अर्थसत्य, वास्तविकता दडलेली असते.

Zodiac clips on the silver screen | झाडीपट्टीच्या जान्हवीचे रुपेरी पडद्यांवर पदार्पण

झाडीपट्टीच्या जान्हवीचे रुपेरी पडद्यांवर पदार्पण

Next
ठळक मुद्देजी.एम.बी.हायस्कूची विद्यार्थिनी : ग्रामीण भागात घडत आहेत कलावंत

संजयकुमार बंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. त्यात संस्कृतीचे दर्शन होत असते. ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. कुठलाही निर्माता, दिग्दर्शक आपल्या चित्रपटाविषयी आशावादी असतो. प्रत्येक चित्रपटाच्या कथानकांमध्ये कुठेतरी अर्थसत्य, वास्तविकता दडलेली असते. चित्रपटात भूमिका साकारणारे कलावंत म्हणजे दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेले व्यक्तिमत्व असते. कलावंत रुक्ष, बेचव जीवनाला लज्जत आणतात. अर्जुनी मोरगावासारख्या झाडीपट्टीतील नाट्य कलावंत व जी.एम.बी. इंग्रजी हायस्कुलची विद्यार्र्थिनी बाल कलावंत जान्हवीने दिव्यांग चित्रपटाच्याद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे.
जान्हवी योगराज शिवणकर ही अर्जुनी मोरगावजवळील अरततोंडी या छोट्याशा गावातील मुलगी. बालपणापासूनच नृत्य, संगीत, शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम, हिपहॉप, कंटेम्पटरी, अभिनय व सोबतच तीव्र बुद्धिमत्ता असलेली ही बालकलावंत अनेक स्पर्धामधून बक्षीसाची, पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तिला नृत्याचे धडे घरातूनच आईकडून मिळाले व आज गोंदिया येथील दिग्दर्शक दिलीप कोसरे यांच्या दिव्यांग या चित्रपटातून एका लहान मुलीची भूमिका ती साकारत आहे. याबद्दल नागपूर येथे झाडे कुणबी परिचय मेळाव्यात नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले. याच चित्रपटात जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अमन लाडे हा ही रुपेरी पडद्यावर प्रथमच झळकतो आहे. दिव्यांग हा चित्रपट मतिमंद, अपंग बालकांच्या जीवनावर आधारीत आहे. दिव्यांगाना आपल्याला सर्वसामान्यासारखे जीवन जगता यावे, मानसन्मान मिळावा हा या चित्रपटाचा मुख्य हेतू आहे. एका छोट्या खेड्यात गरीब कुटुंबात जन्मलेल्या बालकांचा जीवनावर असलेली ही कथा अतिशय मार्मिक आहे. प्रबोधनकारक आहे. आजच्या शिक्षित समाजात दिव्यांगत्वाबाबत गैरसमज आहेत. समाजाचा दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही बदलेला नाही. दिव्यांगाची फरकट लहानपणीच आई-वडील मरण पावल्यामुळे कशी होते यावर या कथानकातून प्रकाश टाकला आहे. जान्हवी शिवणकरला आजवर अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेले आहे. या चित्रपटाचे प्रजासत्ताक दिनी अर्जुनी मोरगाव येथे तहसील कार्यालय कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार धनंजय देशमुख व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत सर्व कलावंताच्या उपस्थितीत प्रमोशन करण्यात आले. अशा या सर्व कलांच दान मिळालेली जान्हवी भविष्य काळात चित्रपटात भूमिका साकारणार आहे व प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. प्राचार्य अनिलकुमार मंत्री, आई-वडील, शिक्षक अतुल बलगुजर यांचे प्रोत्साहन सतत लाभत असल्याचे जान्हवीने सांगितले.

Web Title: Zodiac clips on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.