धान ठेवण्यासाठी जि.प. व न.प.शाळा उपलब्ध करुन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:25+5:302021-06-03T04:21:25+5:30

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र गोदामातील धानाची उचल न झाल्याने धान खरेदी संथ गतीने ...

Z.P. And make NP school available | धान ठेवण्यासाठी जि.प. व न.प.शाळा उपलब्ध करुन द्या

धान ठेवण्यासाठी जि.प. व न.प.शाळा उपलब्ध करुन द्या

Next

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र गोदामातील धानाची उचल न झाल्याने धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. यंदा रबी हंगामात ६५ हजार हेक्टर शेतीतून जवळपास ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्याची धान साठवण क्षमता ४ ते ५ लाख क्विंटल असल्याने खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे असा प्रश्न समोर आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जिल्हा परिषद तसेच नगरपालिकेच्या शाळा बंद आहेत. त्या जागेचा उपयोग धान साठवण करण्यासाठी करता येऊ शकतो. यामुळे शाळेला उत्पन्न देखील मिळेल. असे पत्र गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना पाठविले आहे. धान साठवण करण्यासाठी जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या शाळा उपलब्ध करून दिल्यास धानाची उचल होईल. येणारा पावसाळा पाहता धान खराब होण्यापासून सुरक्षित ठेवता येईल तसेच शेतकरी बांधव चिंतामुक्त होऊन आनंदाने खरीप हंगामाची तयारी करू शकेल, असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.

Web Title: Z.P. And make NP school available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.