जि.प. व पं.स. निवडणुकांची सुरू झाली लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:37+5:302021-02-12T04:27:37+5:30

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी संपला. मात्र, काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे ...

Z.P. And P.S. Elections have almost started | जि.प. व पं.स. निवडणुकांची सुरू झाली लगबग

जि.प. व पं.स. निवडणुकांची सुरू झाली लगबग

Next

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी संपला. मात्र, काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याचे आता या लगबगीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २ फेब्रुवारीच्या आदेशान्वये गोंदिया जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीचा वापर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक विभाग, निर्वाचन गणाकरिता प्रभागनिहाय मतदारयादीचे विभाजन करून सदर प्रारूप मतदारयादी नागरिकांच्या अवलोकनार्थ ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर, २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अंतिम व

अधिप्रमाणित मतदारयादी ३ मार्च रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय कार्यालयातील सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदारयादीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास हे आक्षेप, हरकती संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात विहित मुदतीत दाखल करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे आक्षेप, हरकती विचारात घेतले जाणार नाही.

.......

दोन्ही ठिकाणी नावे असणाऱ्यांवर होणार कारवाई

मतदारयादीमध्ये ज्या मतदारांची नावे लगतच्या गावामध्ये व नगर परिषद क्षेत्रातसुद्धा मतदार म्हणून नोंदविली आहेत. मतदार गणामधील क्षेत्रात एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदविली आहेत, अशा दुबार मतदारांनी आपले नाव फक्त एकाच जागी, ठिकाणी राहील व दुसऱ्या ठिकाणी असलेले नाव कमी करण्‍याबाबत अर्ज त्वरित संबंधित मतदान केंद्र अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर करावा. ज्या मतदारांची मतदारयादीमध्ये दुबार नावे आहेत, असे मतदार मतदान केंद्रांवर आल्यास त्यांच्याविरुद्ध तोतयेगिरी व बोगस मतदान करणारा म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

.....

Web Title: Z.P. And P.S. Elections have almost started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.