उपचारादरम्यान १० महिन्याच्या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप : गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा
By admin | Published: December 3, 2015 12:35 AM2015-12-03T00:35:03+5:302015-12-03T00:35:03+5:30
जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
Next
ज गाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मगन गोमाभाऊ भोई, रा. जिजाऊनगर यांनी आपली भाची मंगला अशोक भोई (रा. विटा, जि. पुणे) हिला दिवाळीसाठी आपल्या घरी आणले होते. तिचा मुलगा प्रवीण (१० महिने) या बालकास सर्दी झाल्याने त्याला बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता या बालकाचा मृत्यू झाला. हलगर्जीपणाचा आरोपमुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला असून याबाबत त्यांनी सांगितले की, मुलाला केवळ सर्दी असल्याने त्याला उपचारासाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी मात्र त्याला दाखल करावे लागेल असे सांगून दोन हजार रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) घेऊन बालकाला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान बालकाला औषध दिले व त्याला उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत चुकीचे उपचार केल्याने तसेच येथील नर्सेस स्टाफच्याही दुर्लक्षामुळे या बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप मगन भोई यांनी केला आहे. गुन्हा दाखल करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊया प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण होते. पोलिसांकडून चौकशीरामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची चौकशी केली. शवविच्छेदनानंतर होणार कारण स्पष्टया बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.