१० रूपयांच्या लवंगानं सांधेदुखीसह कॅन्सरसाख्या गंभीर आजारांपासून राहाल लांब, वाचा इतर फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 03:40 PM2021-02-02T15:40:10+5:302021-02-02T15:40:39+5:30
Health Tips in Marathi : अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लवंग लिव्हर आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
दिसायला अगदी लहानशी असणारी लवंग खूप गुणकारी असते. लवंगात अनेक औषधी गुणधर्म असतात. लवंग खाल्यानंतर शरीरात उष्णता तयार होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांमध्ये लवंगाचा वापर केला जातो. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लवंग लिव्हर आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला लवंगाच्या औषधी गुणधर्माबद्दल सांगणार आहोत. हेल्थ लाईन या वेबसाईडवर लवंगाच्या फादयांबाबत अधिक माहिती दिली आहे.
लवंगातील पोषक तत्व
लवंगात व्हिटामीन , फायबर्स आणि इतर शरीराला पोषक असणारी खनिजं असतात. म्हणून आरोग्य तज्ज्ञ लवंगाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. एक चमचा लवंगात ६ कॅलरीज असतात. मेंदूला चालना देण्यासाठी तसंच योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंगात अनेक एंटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आजारांना रोखण्यास मदतहोतो. विशेष म्हणजे ताण तणाव कमी प्रमाणात येतो. लवंगात न्यूजेनॉल नावाचा एक पदार्थ असतो जो एंटीऑक्सिडेंट्सच्या स्वरूपात कार्य करतो. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
कॅन्सरपासून होतो बचाव
अभ्यासानुसार लवंगात अशी अनेक तत्व असतात. ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. कॅन्सरमधील ट्यूमर वाढण्यापासून रोखता येतं. लवंगातील युजेनॉलमध्ये एंटी कॅन्सर गुणधर्म असतात.
बॅक्टेरिया नष्ट होतात
लवंगात अनेक मायक्रोबायल गुण असतात. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. लंवगाचे तेल फूड पॉईंजनिंग निर्माण करत असलेल्या बॅक्टेरियांची लढण्यासाठी फायदेशीर ठरते. लवंगातील एंटीबॅक्टेरिअल गुण दातांसाठीही फायदेशीर असतात. यामुळे हिरड्यांमधील किटाणू मरण्यास मदत होते.
पचनक्रीया सुधारते
लवंगाच्या सेवनाने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटाच्या अनेक तक्रारी जसे गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी असते. तसेच लवंगाच्या सेवनाने अॅसिडिटीवरही आराम मिळतो. ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष
दातदुखीवर फायदेशीर
दातदुखीवरही लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. जर तुम्ही दातदुखीने त्रस्त आहात तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. आराम मिळेल.चिंताजनक! या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्याचा धोक्याचा इशारा
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत
बोलताना समोरच्याला आपल्या तोंडाचा दुर्गंध येतो. त्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होतो आणि फ्रेश वाटते. Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर