१०३ वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं जास्त जगण्याचं रहस्य, या गोष्टींनी तुम्हीही जगू शकता जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:18 AM2024-06-07T11:18:45+5:302024-06-07T11:19:19+5:30
जे लोक १०० वर्ष जगतात ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते.
कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं. १०० वर्ष जगावं असंही अनेकांना वाटतं. पण आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष जगतात ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी फॉलो करून इतकं जगता यावं. तर १०० वर्ष कसं जगता येईल हे एका १०० वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
महिला डॉक्टर ग्लेडिस मॅकगॅरी यांचं वय १०३ वर्ष आहे. या वयातही त्या फार अॅक्टिव आहेत. डॉ. ग्लेडिस यांनी 'द वेल लिव्ड लाइफ : ए १०३ ईअर ओल्ड डॉक्टर्स सीक्रेट्स टू हेल्थ अॅन्ड हॅपीनेस अॅट एवरी एज' नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि यात त्यांनी जास्त आयुष्य जगण्याचे सीक्रेट्स सांगितले आहेत.
अशात डॉक्टर ग्लेडिस यांच्या इतकं जगण्याचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हालाही कसं जास्त जगता येईल हे जाणून घेता येणार आहे.
नवीन शिकत रहा
डॉ. ग्लेडिस यांनी सांगितलं की, आपल्यापैकी सगळ्यांनी काहीना काही नवीन शिकणे, पुढे जाणे आणि आपल्या क्वालिटी वाढवण्याचं काम केलं पाहिजे. यामुळे तुम्ही सजग राहता.
स्वत:वर प्रेम करा
एका रिसर्चनुसार, जगात प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती डिप्रेशनचा शिकार आहे. हे लोक स्वत:वर फार कमी प्रेम करतात. त्यामुळे जास्त जीवन जगण्यासाठी आधी तुम्ही स्वत: प्रेम करायला शिका.
एनर्जी वाया घालवू नका
डॉ. ग्लेडिस यांच्यानुसार, तुमची एनर्जी अशा गोष्टीवर घालवा जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा आनंद देते. हे काही फार अवघड काम नाही. जेव्हा या पद्धतीने आपण जीवन जगत असतो तेव्हा खरंच आपण जीवन जगत असतो.
काय खावे?
प्लांट बेस्ड डाएट फॉलो केली पाहिजे. म्हणजे झाडांपासून बनलेले पदार्थ हिरव्या पालेभाज्या, फळं इत्यादींचं सेवन केलं पहिजे. तसेच भरपूर पाणी प्यायला हवं. याने तुमचं आयुष्य वाढू शकतं.