आपातकालीन सेवेसाठीची ‘१०८’ अॅम्बुलन्स आता मोबाइल अॅपवर !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 06:19 PM2016-12-25T18:19:20+5:302016-12-25T18:19:20+5:30
आपत्कालिन वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपण ‘१०८’ या नंबरवर डायल करुन अॅम्बुलन्सला पाचारण करतो आणि काही वेळातच डॉक्टरसह सुसज्ज अॅम्ब्युलन्स घटनास्थळी येते.
Next
आ त्कालिन वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपण ‘१०८’ या नंबरवर डायल करुन अॅम्बुलन्सला पाचारण करतो आणि काही वेळातच डॉक्टरसह सुसज्ज अॅम्ब्युलन्स घटनास्थळी येते. या सेवेचीही आता डिजिटायजेशन झाले असून, यासाठी मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. आपत्कालिन परिस्थितीत या अॅपवर एक क्लिक केल्यास दहा सेकंदांमध्ये अॅम्ब्युलन्स सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जाऊन काही वेळातच अॅम्ब्युलन्स घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होणार आहे. आतापर्यंत या सेवेमुळे बारा लाख जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट अॅटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालिन परिस्थितीत ‘१०८’ क्रमांक फिरविल्यास तातडीने वैद्यकीय सेवा मिळते.
गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अँड्रॉइड मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करता येते. या अॅम्ब्युलन्ससाठी फोन करणाºया व्यक्तींना बहुतेकवेळा घटनास्थळाचा नेमका पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे ते ठिकाण शोधण्यात वेळ जातो. पण अॅपमुळे ठिकाणाची माहितीही अचूक मिळते. त्यामुळे रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत प्राप्त होते.