High Cholesterol : प्रमाणापेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल वाढवतात हे 12 पदार्थ, सोडले नाही तर येऊ शकतो हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:56 AM2023-03-08T11:56:34+5:302023-03-08T11:59:24+5:30
Cholesterol : भारतात जेवण तयार करण्यासाठी या पदार्थांचा फार जास्त वापर केला जातो. आपल्याकडे चटपटीत, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणं जास्त पसंत केलं जातं.
कोलेस्ट्रॉल (Cholesterol) एक भयंकर आणि जीवघेणी समस्या बनत चालली आहे. मेणासारखा हा पदार्थ ब्लड सर्कुलेशन रोखलं जातं. ज्यामुळे हार्ट डिजीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल तयार होण्याचं कारण आपण खात असलेले पदार्थच आहेत. तेल, तूप, साखर आणि मैदा यांसारख्या पदार्थांपासून भयंकर कोलेस्ट्रॉल तयार होतं.
भारतात जेवण तयार करण्यासाठी या पदार्थांचा फार जास्त वापर केला जातो. आपल्याकडे चटपटीत, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणं जास्त पसंत केलं जातं. समोसे, गुलाबजाम, कचोरी, छोले भटुरे, कोरमा, मलाई, तूप, लोणी यांचं सेवन अधिक केलं जातं. या सगळ्यांमुळे नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. चला जाणून घेऊन कोणत्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल अधिक वाढतं.
मांस आणि ते बनवण्याची पद्धत
हार्वर्ड हेल्थनुसार, मांसामध्ये आधीच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं. सतत मांस खाल्ल्याने फक्त कोलेस्ट्रॉलच वाढतं असं नाही तर इतरही आरोग्यासंबंधी समस्या होतात. आपल्याकडे मांस भरपूर तेल, तूप किंवा लोण्यात बनवलं जातं.
डीप फ्राय चिकन किंवा मासे
खेकडे, झींगे यांसारख्या समुद्री जीवांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आधीच जास्त असतं. सामान्यपणे लोक हे फ्राय करून खातात. याचप्रमाणे डीप फ्राय चिकनचं सेवन केलं जातं. चिकन कमीत कमी तेलात ग्रिल, बेक किंवा स्टिर फ्राय करून खा.
समोसा, कचोरी, आलू टिक्की
समोसा, कचोरी, आलू टिक्की आणि भजी याशिवाय तर भारतीय लोकांचं जेवण, नाश्ता पूर्ण होत नाही. या सगळ्याच पदार्थांमध्ये तेल जास्त असतं. याच कारणाने हे खाऊन कोलेस्ट्रॉल लेव्हल हाय होते.
मलाई, तूप आणि लोणी
तूप किंवा लोणी भारतात खूप खाल्लं जातं. NCBI च्या एका रिसर्चनुसार, लोणी, तूप, चीज, पाम तेल आणि खोबऱ्याच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. जेवण तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, राइस ब्रान ऑयल, फल्ली तेल, सूर्यफुलाचं तेल आणि वनस्पती तेलाचा वापर करा.
जीलेबी, गुलाबजाम
मिठायांमध्ये साखरेचा खूप जास्त वापर केला जातो. साखरेच्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. जीलेबी, गुलाबजाम आणि इतरही अनेक मिठायांमुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतं.