डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:45 AM2019-02-18T10:45:05+5:302019-02-18T10:46:36+5:30

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं.

15 minutes walk after a meal is beneficial for diabetes type 2 patients | डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

googlenewsNext

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं. पण हा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी गरजेचा आहे केवळ १५ मिनिटांचा वॉक. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जेवण केल्यावर १५ मिनिटे वॉक केल्याने डायबिटीजच्या रुग्णांना शुगर वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी फायदा होतो. हा रोज ४५ मिनिटे वॉक करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे.

अभ्यासक डी पेट्रो यांनी सांगितले की, 'दुपारी जेवण केल्यावर निर्माण झालेल्या इन्सुलिनचं प्रमाण दिवसभर कमी होत जाते. कारण दिवसा बरच चालणं-फिरणं होतं. तर रात्रीच्या जेवणानंतर बसून राहिल्याने ब्लड ग्लूकोज वाढण्याची शक्यता अधिक असते. याने धोका अधिक वाढतो. 

न्यूझीलॅंडच्या ओटागो यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, वॉकदरम्यान आपल्या शरीरातील मसल्स ग्लूकोजचा उपयोग करते, याने रक्तात शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे डायबिटीजच्या रुग्णांना शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. 

डायबिटीजमध्ये काय खावे?

डायबिटीज आज जगभरात आपले पाय पसरत आहे. भारतात जवळपास ४.५ कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. आधी डायबिटीजकडे वृद्धापकाळात होणारा आजार म्हणून पाहिले जात होते. पण आता हा आजार वृद्धांसोबतच तरुणांमध्येही दिसत आहे. डायबिटीज झाल्यावर रक्तात शुगरचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणं बंद होतं. अशात अनेक वेगवेगळ्या समस्याही होतात. डायबिटीजने ग्रस्त रुग्णांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर कंबर, पाय आणि पाठीच्या कण्याची हाडे कमजोर होतात.  

वेगवेगळ्या शोधांमधून समोर आलं आहे की, कॅल्शिअमचं सेवन केल्याने डायबिटीजचा धोका तर कमी होतोच, सोबतच हा आजार झाल्यावर त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमताही वाढते. जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या शोधानुसार, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर ग्लूकोज नियंत्रित करतं. सहा महिने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी खाण्याचा सल्ला दिल्यास डायबिटीजच्या रुग्णांच्या इन्सुलिनमध्ये फार सुधार होतो. निरोगी राहण्यासाठी १९ ते ५१ वर्षांच्या महिला-पुरुषांनी प्रतिदिन १ हजार मिलि ग्रॅम कॅल्शिअमचं सेवन केलं पाहिजे. वय ७१ वर्ष झाल्यानंतर १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम सेवन केलं पाहिजे.

नैसर्गिक पदार्थांमधून कॅल्शिअम

अ‍ॅलोपॅथी औषधे घेण्याऐवजी अनेक नैसर्गिक खाद्य पदार्थांमधून कॅल्शिअम मिळवता येऊ शकतं. या पदार्थांमधून कॅल्शिअम घेतल्यास त्याचे काही दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. गहू, राजमा, सोयाबीन, मूग, मटकी आणि चणे यांसारख्या धान्यांत भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. तसेच काकडी, गाजर, भेंडी, मेथी, कारलं, मूळा, टोमॅटो आणि रताळे यातूनही कॅल्शिअम भरपूर प्रमाणात मिळतं. यासोबतच अननस, आंबे, संत्री आणि नारळ यातूनही कॅल्शिअम मिळतं.

डायबिटोलॉजिया जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दह्याचं नियमीत सेवन केल्यावर डायबिटीज टाइप-२ धोका २८ टक्के कमी होतो. तेच दूध आणि दुधापासून तयार खाद्यपदार्थ जसे की, पनीर सेवन केल्यास शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण नियंत्रित राहतं. 

Web Title: 15 minutes walk after a meal is beneficial for diabetes type 2 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.