१० पेक्षा कमी पट असणार्‍या १६ शाळा

By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30

शिक्षण समिती: अशा शाळांवर दोनऐवजी आता एकच शिक्षक ठेवा

16 schools having less than 10 cards | १० पेक्षा कमी पट असणार्‍या १६ शाळा

१० पेक्षा कमी पट असणार्‍या १६ शाळा

Next
क्षण समिती: अशा शाळांवर दोनऐवजी आता एकच शिक्षक ठेवा
सोलापूर: जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पट असणार्‍या एकूण १६ शाळा आहेत़ या शाळांवर प्रत्येकी २ शिक्षक आहेत. त्यामुळे त्यापैकी एक शिक्षक तालुक्यात ज्या शाळांवर शिक्षक नाहीत अशा ठिकाणी पाठविण्याचा निर्णय जि़ प़ शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर यांनी सांगितले़
शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती़ १० पेक्षा कमी पटाच्या शाळांबद्दल या बैठकीत पुन्हा चर्चा झाली़ त्यामुळे या १६ शाळांमध्ये असलेल्या प्रत्येकी दोन शिक्षकांऐवजी एक दुसर्‍या शाळेत पाठविण्याचा यावेळी निर्णय झाला़ पार्क चौकात नेहरु वसतिगृहात ७०० मुलांना प्रवेश देण्यात आला आहे़ जि़प़ प्राथमिक शाळांमधील काही शाळांना अद्याप गणवेश दिला नाही, अशा मुलांना १५ ऑगस्टपर्यंत गणवेश द्यावेत़ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०३ स्वच्छतागृहे बांधण्यासाठी प्रत्येकी दीड लाखाचा निधी मंजूर झाला आहे़
चौकट़़़
तिघांना नोटीस
आरोग्य खात्यामधील नन्ना, जवळेकर आणि इंगळे या कर्मचार्‍यांना निधी मंजूर असताना देखील उपसंचालकांकडून प्रशासकीय मंजुरी घेण्याबाबत दिरंगाई केली म्हणून त्यांना नोटिसा काढाव्यात, असा निर्णय सभेत घेण्यात आला़ गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रस्ताव प्रलंबित आहेत़ येत्या १४ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते वळसंग येथील ओपीडीचा शुभारंभ केला जाईल असे आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर यांनी संागितले़

Web Title: 16 schools having less than 10 cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.