आव्हाणे येथे १९ जणांना अतिसाराची लागण चार बालक जिल्हा रुग्णालयात : गंभीर बालिकेला औरंगाबादला, जिल्हा आरोग्य अधिकार्यांची भेट
By admin | Published: June 7, 2016 07:41 AM2016-06-07T07:41:58+5:302016-06-07T07:41:58+5:30
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले असून गावात २५ ते ३० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Next
ज गाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले असून गावात २५ ते ३० रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, १० ते १५ वर्षांपूर्वी या प्रकारची घटना घडली होती. पाईनलाईन गळती तसेच पाणी पुरवठा करणारी टाकी स्वच्छ होत नसल्याने या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे नागरिकांनी सांगितले.दोन दिवसांपासून गावातील अनेकांना अतिसाराचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अतिसाराची लक्षणे आढळून आली. गटारींमधून पाईपलाईन गेली असून तिला अनेक ठिकाणी गळती आहे. तसेच पाण्याची टाकी स्वच्छ होत नसल्याने अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा प्रकार उद्भवल्याची माहिती मिळाली आहे.यांना झाली लागण... गावातील १९ जणांना अतिसाराची बाधा झाली आहे. त्यात चार बालकांचा समावेश आहे. तसबिया शेख अहमद (१०), आसीफ इम्रान खाटीक (१२), अरबाज इम्रान खाटीक (१०), मायरा इरफान पिंजारी (४), उमेरा इरफान पिंजारी (२), असनेद सिद्दीक खान (१५ महिने), मोईन खान सिद्दीकी (४), इम्तियाज अब्दुल पिंजारी (६०), कैलास उत्तम भील (४०), सुमनबाई रघुनाथ सुरवाडे (६५) आदींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.नऊ महिन्यांची बालिका गंभीरमाहिल इरफान पिंजारी (९ महिने) या चिमुरडीला सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात नेले. मात्र तेथेही गंभीर झाल्याने पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी १०८ रुग्णवाहिका त्यांना उपलब्ध करून दिली व औरंगाबादला रवाना केले. तिचे आजोबा अब्दुल पिंजारी यांनादेखील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गावातील १९ नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यापैकी ६ जणांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर इतर सहा जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गावातही ७ नागरिकांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे तसेच कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आव्हाण्याला पाठवले आहे. पाण्याचे पाच नमुने तपासणीसाठी घेतले असून जिल्हा प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात येईल. -डॉ. शामसुंदर निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी