Sleep Trick: फक्त 2 दोन मिनिटात येणार गाढ झोप, फारच अनोखी आहे मनगटाची ही खास ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:40 PM2022-06-23T17:40:16+5:302022-06-23T17:49:37+5:30

Quick Sleep Trick: सोशल मीडियावर झोपेसंबंधी एक ट्रिक व्हायरल होत आहे. याबाबत दावा केला जात आहे की, ही केल्याने तुम्हाला बेडवर गेल्यावर केवळ 2 मिनिटांमध्ये झोप येऊ शकते.

2 minute sleep trick can help you to fall asleep more quickly | Sleep Trick: फक्त 2 दोन मिनिटात येणार गाढ झोप, फारच अनोखी आहे मनगटाची ही खास ट्रिक

Sleep Trick: फक्त 2 दोन मिनिटात येणार गाढ झोप, फारच अनोखी आहे मनगटाची ही खास ट्रिक

googlenewsNext

Quick Sleep Trick: बेडवर पडल्या पडल्या झोप येणं हे काही लोकांसाठी केवळ स्वप्नच आहे. बऱ्याच लोकांना रात्री लवकर झोप न येण्याची समस्या असते. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा जास्त थकव्यानंतर झोप सहजपणे येते, पण काही लोकांसोबत असं होत नाही. अशात काही लोक झोप येण्यासाठी औषधांचा आधार घेतात. सोशल मीडियावर झोपेसंबंधी एक ट्रिक व्हायरल होत आहे. याबाबत दावा केला जात आहे की, ही केल्याने तुम्हाला बेडवर गेल्यावर केवळ 2 मिनिटांमध्ये झोप येऊ शकते.

टिकटॉकवर एका यूजरने नव्यी स्लीप ट्रिकबाबत सांगितलं   आहे. टिकटॉकवर या यूजरचं अकाउंट youngeryoudoc नावाने आहे. या व्यक्तीच्या या व्हिडीओला आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे. या व्यक्तीने सांगितलं की, मनगटावरील एका खास स्पॉटला रब केल्याने म्हणजे घासल्याने काही मिनिटांमध्ये झोप येऊ शकते. त्याने असाही दावा केला की, असं काही मिनिटे केल्याने तुम्हाला गाढ झोप लागू शकते.

व्हिडीओत झोप येण्यासाठी या व्यक्तीने आपल्या मनगटाच्या आतील पल्स पॉइंटवर 2 ते 3 मिनिटे सर्कुलर मोशनमध्ये मसाज करण्यास सांगितलं. मनगटाच्या आतल्या बाजूस पल्स पॉइंट एक एक्यूप्रेशर पॉइंट असतो. या जागी जर तुम्ही रब केलं किंवा हलक्या हाताने त्याजागी दबाव टाकला तर याने तुमचा मेंदू शांत होतो. ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये मनगटाच्या या भागाला शेन मेन म्हटलं आहे. ज्याचा अर्थ आत्म्याचं द्वार असा होतो.

2010 आणि 2015 मध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या स्टडीजमध्ये लोकांच्या मनगटाच्या पल्स पॉइंटवर मसाज करण्यात आली. ज्याचे निष्कर्ष फार चांगले आले. रिसर्चमधून समोर आलं की, या सर्व लोकांची स्लीप क्वालिटी चांगली होती आणि स्लीप डिसऑर्डरची समस्याही बरीच कमी झाली. जे लोक झोपेसाठी औषधांचं सेवन करत होते त्यातही घट झाली.

पण रिसर्चर्स असंही मत आहे की, हा रिसर्च छोटा होता ज्यातून हे समजून घेणं फार अवघड आहे की, ज्या लोकांना इंसोमेनियाची समस्या आहे, त्यांना याने फायदा मिळेल की नाही. तसेच जर स्वत:हून आपल्या मनगटाच्या पल्स पॉइंटची मसाज कराल तर हे फायदेशीर ठरेल किंवा नाही. अशात यावर अजून रिसर्च होणं गरजेचं आहे. पण कोणताही उपाय करण्याआधी एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: 2 minute sleep trick can help you to fall asleep more quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.