रागात आजीने नातीचा पाय टाकला उकळत्या पाण्यात; चिमुरडी होऊ शकते अधू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:04 PM2019-08-25T17:04:14+5:302019-08-25T17:07:56+5:30
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळे स्वतःच्या रागावार नियंत्रण ठेवणं नेहमीच उत्तम राहतं, असं अनेकदा आपण ऐकतो. राग अनावर झाल्याने अनेक गुन्हे घडत आहेत. याबाबत अनेक घटना आपल्याला दररोज म्हटलं तरिही पाहायला मिळतात.
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळे स्वतःच्या रागावार नियंत्रण ठेवणं नेहमीच उत्तम राहतं, असं अनेकदा आपण ऐकतो. राग अनावर झाल्याने अनेक गुन्हे घडत आहेत. याबाबत अनेक घटना आपल्याला दररोज म्हटलं तरिही पाहायला मिळतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. रान अनावर झाल्याने एका आजीने आपल्या चिमुकल्या नातीच्या पायावर चक्क उकळतं पाणी टाकलं आहे. आजीने असं का केलं माहित आहे?, सकाळपासून आजीचा दिवस फार त्रासदायक गेला होता. त्यामुळे आजीने रागात आपल्या नातीच्या पायावर उकळतं पाणी टाकलं.
फक्त दोन वर्षांची आहे चिमुरडी
काही दिवसांपूर्वी ही घटना अमेरिकेमध्ये घडली. Metro US ने दिलेल्या वृत्तानुसार, चिमुरडीचं नाव कायली रॉबिन्सन आहे. तसेच ती फक्त दोन वर्षांची आहे. आजीने केलेल्या या अमानुष कृत्यामुळे कायलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चिमुकलीचा पायाला इन्फेक्शन झालं असून हे वाडलं तर तिला आपला पाय गमवावाही लागू शकतो.
अमानुष कृत्य करणाऱ्या आजीला अटक
कायलीच्या आईने सांगितल्यानुसार, कायलीची आजी Vaughn यांनी तिला शिक्षा देण्यासाठी तिचा पाय गरम पाण्यामध्ये टाकला. Vaughn ने दिवसभरात अनेक वाईट घटनांचा सामना केला होता. त्याचाच परिणाम म्हणून तिने हे कृत्य केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच Vaughn ला पोलिंसानी अटक केली आहे.
स्विमिंग करण्यासाठी गेली होती आई
कायलीची आई ब्रिटनी यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीला आजीजवळ ठेवून आपला होणारा नवरा आणि दोन मुलांसोबत स्विमिंग करण्यासाठी बाहेर गेली होती. थोड्या वेळाने Vaughn ने कायलीच्या आईला फोन केला आणि घर परत येण्यास सांगितलं. पण कारण सांगितलं नाही. घरी परतल्यानंतर ब्रिटनी यांना Vaughn ने सांगितलं की, कायलीला आंघोळीसाठी बाथरूममध्ये काम करण्यासाठी गेले होते. ज्यावेळी मी परत आले तेव्हा तिला भाजलं होतं. त्यानंत कायलीची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर पोलिसांनी आजीला अटक केली.
दरम्यान, कायलीचा पाय लवकर बरा होऊन ती चालायला लागेल अशी आशा व्यक्त करण्यात येत असून आजीला 15 ते 16 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.